Goa-Pune Kadamba Bus: Dainik Gomantak
गोवा

Goa-Pune Kadamba Bus: कदंबा महामंडळाची गोवा-पुणे बससेवा अनियमित; प्रवाशांची गैरसोय

आंतरराज्य मार्गांवर बसेसचा तुटवडा

Akshay Nirmale

Goa-Pune Kadamba Bus: कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (KTCL) च्या बसेसचे गोवा-पुणे सेवेवर नाराजी व्यक्त केली जात आहे. या मार्गावरील या बसची सेवा अनियमित आहे. तसेच काहीवेळा अचानक ही बस रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.

या मार्गांवरील विशेष नॉन-एसी बसेस शेवटच्या क्षणी रद्द केल्याचे प्रकार घडताहेत. याशिवाय शिर्डीला जाणाऱ्या बसेसही प्रवाशांच्या संख्येवर अवलंबून असतात.

गोवा-मुंबई मार्गासाठीही दोन बसेस चालवायची असताना दररोज एकच बस धावत आहे. पुण्यासाठी तीन बसेस असल्या तरी त्या अनियमित असतात. गोव्यातील स्थानिक इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

एक किंवा दोन बसेस रद्द होतात. या मार्गावरील नियमित प्रवाशांना त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांकडे बऱ्याचदा पर्याय नसतो.

गोवा-बंगळूरू आणि गोवा हैदराबाद मार्गांवर धावणाऱ्या बसेसचीही हीच परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे.

फोंडा येथून जाणाऱ्या नॉन एसी बसेसही आठ महिन्यांपासून बंद आहेत. नॉन एसी बसेस वेळेवर पोहचतात. किंवा त्या जलद असतात त्यामुळे प्रवाशांची या बसेसना पसंती असल्याचे दिसते.

प्रवाशांमधून गोवा-पुणे बससेवा सुधारण्याच्या, या मार्गावरील बसेसच्या वेला निश्चित्त करण्याच्या मागण्या होत आहेत.

दरम्यान, सर्व आंतरराज्य मार्गांवर बसेसचा तुडवडा असल्याची माहिती आहे. सरकारने सध्या आणखी 50 वाहने मागवली आहेत आणि त्यापैकी काही ईव्ही बसेस आहेत. या बसेस कदंबच्या ताफ्यात सामिल व्हायला आणखी काही महिने लागतील.

बसेस दाखल झाल्यावर आंतरराज्य मार्गांवरील बससेवा सुधारण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT