Prostitution in Goa Dainik Gomantak
गोवा

Prostitution in Goa: गोव्यात वेश्‍या व्यवसायाचे प्रमाण वाढतेच!

सरकारने छापे टाकणे केले बंद : राज्याची प्रतिमा मलीन होण्याची भीती; अनैतिक बाबींना प्रोत्साहन

गोमन्तक डिजिटल टीम

Prostitution in Goa म्हापसा शहरात एक वर्षापूर्वी बस स्थानकासमोर काही मोजक्याच वेश्‍या ग्राहकांना आकर्षित करताना दिसायच्या... सध्या त्यांची संख्या ७० झाली आहे...

दाबोळी विमानतळाबाहेर पडल्याबरोबर तुम्हाला कॅसिनोची जाहिरात दिसते... जरा पुढे गेल्यानंतर तुम्हाला ‘सेफ सेक्ससाठी कंडोम वापरा’, अशी जाहिरात दिसते. जणू काय गोवा राज्य सेक्सची जाहिरातच करते आहे...

गोव्यातील वेश्‍या व्यवसायाविरोधात काम करणारी ‘अर्ज’ ही संघटना वास्कोत गेली अनेक वर्षे इमानेइतबारे कार्यरत आहे. विविध अहवाल तयार करणे, प्रत्यक्ष देखरेख, शिवाय मुलींना वेश्‍या व्यवसायातून मुक्त करण्याचे विधायक कार्य ते करतात; परंतु राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे या संघटनेचे पदाधिकारी कमालीचे नाराज झाले आहेत.

कॅसिनो, जुगार, अमली पदार्थ आणि वेश्‍या व्यवसाय यांचा परस्परांशी संबंध असून गोवा राज्यात या अनैतिक गोष्टींना प्रोत्साहन मिळत असल्यासारखी परिस्थिती आहे.

शिवाय राज्य सरकारने गोव्याचे नाव बदनाम होते, असे वाटून घेऊन वेश्‍या व्यवसायासाठी आणलेल्या मुलींचे रक्षण करण्याची मोहीमच सोडून दिली आहे, अशी प्रतिक्रिया वास्कोच्या ‘अर्ज’ संघटनेचे प्रमुख अरुण पांडे यांनी आज ‘गोमन्तक’ला दिली.

गोव्यात वेश्‍या व्यवसायावर छापे टाकण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे, असे सांगून पांडे म्हणाले की, मला आश्‍चर्य वाटते, छापे टाकून मुलींची सुटका करण्याचे काम थंडावले आहे. तो हेतूपुरस्सर घेतलेला निर्णय आहे, असे मला वाटते.

गोव्यातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही हेच घडते आहे. मुलींना वेश्‍या व्यवसायातून मुक्त केल्याच्या घटना वाढल्या म्हणजे यांच्याकडे वेश्‍या व्यवसाय सुरू आहे, अशी प्रतिमा होईल, अशी भीती सरकारला वाटत असावी.

मसाज पार्लरआडून चालतात काळे कारनामे

सेक्ससाठी पैसे देऊन मुली मिळवणे, हा गुन्हा असून राज्य सरकारने आपल्या कारवाईतून ही बाब ठासून सांगण्याची आवश्‍यकता निर्माण झाल्याचे मत ‘अर्ज’च्या या कार्यकर्त्याने मांडले.

गोव्यात सध्या बहुतेक शहरांमध्ये वेश्‍या व्यवसायाचे पेव फुटले असून अनेक शहरांमध्ये मसाज पार्लर सुरू झाली आहेत.

पर्यटकांना सेवा देण्याच्या नावाखाली तेथे वेश्‍या व्यवसाय चालतो. पर्यटकांची तेथे रिघ लागलेली असते. कॅसिनोंमध्येही हे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे.

वास्तविक मुलींची या नरकातून सुटका करणे, हा प्रकार राज्यासाठी निश्‍चितच गौरवाचा ठरेल. उलट सरकारने अशा प्रकारांकडे काणाडोळा करण्याची प्रवृत्ती बाळगल्यास मुलींना बळजबरीने वेश्‍या व्यवसायासाठी आयात करण्याचे प्रकार वाढतील व या गुन्हेगारीला पाठबळ मिळेल.

- अरुण पांडे, प्रमुख, ‘अर्ज’ संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा काँग्रेस नेत्यांना घेतलं ताब्यात

Goa Congress Protest: 28 मतदार एकाच खोलीत? निवडणूक अधिकाऱ्यांची अचानक नेमणूक; काँग्रेसचा मोठा आरोप

Govt Raises Gambling Fines: सरदेसाईंच्या स्टिंग ऑपरेशननंतर सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर, जुगार दंडात केली मोठी वाढ

Cutbona Jetty: कुटबण जेटीवर SOP लागू! मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन; कामगारांची तपासणी सुरू

Bhausaheb Bandodkar: गोवा मुक्त होण्यापूर्वी, अनेक भागांत ‘भाऊसाहेब’ हे नाव लोकप्रिय होते..

SCROLL FOR NEXT