Goa: प्रगतशील शेतकऱ्याने हळद आणि आल्याची केली लागवड
Goa: प्रगतशील शेतकऱ्याने हळद आणि आल्याची केली लागवड  Dainik Gomantak
गोवा

Goa: प्रगतशील शेतकऱ्याने हळद आणि आल्याची केली लागवड

दैनिक गोमन्तक

मोरजी: सरकारी नोकरी नाही म्हणून पायावर पाय टाकून बसण्यापेक्षा असलेल्या शेतात विविध पिकाचे उत्पन्न घेवून शेतीद्वारे क्रांती केली तर सरकारी नोकरीची गरज नाही. हे दाखवून दिले आहे पार्से येथील युवा प्रगतशील शेतकरी श्रीराम जयराम साळगावकर. हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून आहे.

भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात स्वयंपाकात याचा वापर करतात. हळदीला आयुर्वेदामध्ये " हरिद्रा " म्हणतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात.हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो,ती जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. हळद चुर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली जाते व रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते.

या हळदीचे पिक श्रीराम साळगावकर यांनी आपल्या घरा शेजारील मोकळ्या जागेत आणि माळरानावरील काजूच्या झाडाखाली याची लागवड केली आहे. शिवाय आले हेही पिक घेतलेलं आहे. श्रीराम साळगावकर यांनी माहिती देताना माळरानावरील हळदीला जंगली जनावरांकडून धोका असतो त्यासाठी उपाय योजना करावी लागते . यंदा 80 किलो हळदीची लागवड केली आहे. जास्त मेहनत घेतली तर किमान एका रोपाला अर्धा किलो हळद मिळू शकते.

जनावरापासून या उत्पन्नाला सुरक्षा मिळावी यासाठी गोमुत्र शेण वापरून औशध फवारणी केली जाते. असे श्रीराम साळगावकर यांनी सांगितले.श्रीराम साळगावकर यांनी सरकारी नोकरीचा हट्ट न धरता शेतीत कष्ठ करून वेगवेगळ्या उत्पन्नाचे प्रयोग करून शेती पिकवत आहे. भात शेतीद्वारे वेगळे प्रयोग करणे, तूरडाळ, भेंडी, झंडू फुले, डालिया,असे प्रयोग केले आहे. काजू बगयातीतही ते उतपन्न घेत आहेत, शिवाय त्यांची पत्नी ग्रुपद्वारे शेती करण्यास प्राधान्य देत आहेत.श्रीराम म्हणतो युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा जर शेतजमीन असेल ती ओलीतीखाली आणून शेतीला प्राधान्य द्या, शेती हि सरकारी नोकरीपेक्षा सुरक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. शेती व्यवसायासाठी सरकारही विविध योजना राबवत आहे त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT