President Droupadi Murmu In Goa Dainik Gomantak
गोवा

President Droupadi Murmu In Goa: अन्‌ अचानक थांबला राष्‍ट्रपतींचा ताफा! विद्यार्थीही भारावले, त्याचं झालं असं की...

जीव्हीएमच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद

गोमन्तक डिजिटल टीम

President Droupadi Murmu In Goa गाड्यांचा ताफा दिसताच, विद्यार्थ्यांनी हर्षोल्हासाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हात उंचावून अभिवादन केले. मात्र, विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर राष्ट्रपतींनी चक्क गाडी थांबवली आणि खाली उतरून जीव्हीएमच्या संकुलात येत विद्यार्थ्यांसमवेत काही क्षण घालविले, फोटो काढले तसेच ‘शिका आणि पुढे जा’ अशा शुभेच्छाही दिल्या.

फर्मागुढीतील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आज गुरुवारी हा सुखद अनुभव आला. देशाच्या पहिल्या नागरिक असलेल्या राष्ट्रपतींसोबत फोटो म्हणजे एक विलक्षण अनुभव असल्याच्या प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सकाळी फर्मागुढीमार्गे कवळेला श्री शांतादुर्गा देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे माहीत असल्याने सकाळपासूनच फर्मागुढीतील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या रस्त्यालगतच असलेल्या महाविद्यालयातील गेटजवळ विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपतींचे सुरक्षारक्षक व फोंड्यातील पोलिसांची मात्र मोठी तारांबळ उडाली.

गाड्या थांबताच सर्वांची धावपळ

नियोजित वेळेनुसार राष्ट्रपतींच्या वाहनांचा ताफा येताना दिसताच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हर्षोल्हासाने हात उंचावत राष्ट्रपतींना अभिवादन केले. विद्यार्थ्यांना पाहताक्षणी राष्ट्रपतींनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली.

अचानकपणे राष्ट्रपतींची गाडी थांबल्याने सुरक्षारक्षकही भांबावले. एकापाठोपाठ एक गाड्या रस्त्याच्या कडेला थांबल्या, कुणालाच कळेना, राष्ट्रपतींनी गाडी का थांबवली.

राष्ट्रपती मुर्मू यांनी गाडीतून उतरून थेट जीव्हीएम महाविद्यालयाची गेट गाठले आणि संकुलात येऊन विद्यार्थ्यांसोबत फोटो काढले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘शिका आणि मोठे व्हा’ असा सल्ला दिला.

ढवळीकरांनी केला सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कवळेतील श्री शांतादुर्गा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

राष्ट्रपतींसमवेत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, देवस्थान समितीचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मुर्मू यांचा यावेळी सन्मान केला व भेटवस्तू प्रदान केली.

खुद्द राष्ट्रपतींनी आपल्या मतदारसंघाला भेट दिल्याने ढवळीकर यांनी आपल्यासाठी हा एक अतिशय आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. दरम्यान, देवस्थान समितीतर्फेही राष्ट्रपतींना देवीची प्रतिमा भेट देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT