Preschool Assistants Protest Dainik Gomantak
गोवा

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Goa Preschool Helpers: राज्यातील पूर्व प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या मदतनीसांना केवळ १० हजार रुपये वेतन देण्यात येते. इतर कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील पूर्व प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या मदतनीसांना केवळ १० हजार रुपये वेतन देण्यात येते. इतर कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत.

या मदतनीस लहान मुलांच्या संगोपनाचे जबाबदारीने काम करतात त्यामुळे त्यांना सरकार कारकुनांना ज्या सुविधा देतात त्या सर्व देण्यात याव्यात, अशी मागणी गोवा ट्रेड अँड कमर्शियल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केली. ते शिक्षण संचालनालयाबाहेर पूर्व प्राथमिक मदनीस संघटनेने काढलेल्या धरणे आंदोलनात बोलत होते. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष निर्मला नाईक, सचिव कांचन सातर्डेकर व इतर मदतनीस उपस्थित होत्या.

दरम्यान, पूर्व प्राथमिक मदतनीसांच्या वेतनात वाढ करावी, रविवारच्या सुट्टीचे वेतन कापू नये आणि त्यांना पूर्ण ३० दिवसांचे वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, पूर्व प्राथमिक मदतनीसांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे आणि त्यांच्या वेतनात दरवर्षी किमान तीन टक्के वाढ करावी, अशीही त्यांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

8th Pay Commission: सॅलरी इंक्रीमेंट की फिटमेंट फॅक्टर, कशात आहे कर्मचाऱ्यांचा खरा फायदा? जाणून घ्या नेमकं समीकरण

गोव्यात येणारे चिकन खरेच सुरक्षित आहे?

SCROLL FOR NEXT