Rain In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rainfall: नवा विक्रम! गोव्यात 'मे'अखेरपर्यंत बरसला 26.28 इंच पाऊस; मडगावात सर्वाधिक नोंद

Goa Pre-Monsoon Rainfall: वरील तीन महिन्‍यांत सर्वाधिक ३२.६७ इंच पावसाची नोंद मडगावात तर सर्वांत कमी पाऊस वाळपई येथे १७.९५ इंच इतका पडला.

Sameer Panditrao

पणजी: १ मार्च ते ३१ मे या तीन महिन्‍यांत राज्यात तब्बल २६.२८ इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. वास्‍तविक या कालावधीत सर्वसाधारणपणे दोन ते तीन इंच पावसाची अपेक्षा असते. परंतु यंदा त्‍यात तब्बल ८५६.९ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

वरील तीन महिन्‍यांत सर्वाधिक ३२.६७ इंच पावसाची नोंद मडगावात तर सर्वांत कमी पाऊस वाळपई येथे १७.९५ इंच इतका पडला. खरेतर २६ मार्च हा एक दिवस ७.५ मिमी पाऊस वगळता उर्वरित पाऊस हा १३ ते ३१ मेदरम्यान पडला आहे. म्‍हणजेच मागील अठरा दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. मागील वीस वर्षांत तरी या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस पडला नसल्याचे अनेक हवामान अभ्यासकांचे मत आहे.

मागील तीन महिन्यांत एकाच दिवशी सर्वाधिक १३९.५ मिमी म्हणजेच ५.४९ इंच पावसाची नोंद २१ मे रोजी करण्यात आली. सर्वसामान्यपणे ५ इंचांहून अधिक पाऊस पडत असेल तर अतिवृष्टी समजली जाते. अशा स्थितीत मान्सूनपूर्व कालावधीत इतका पाऊस पडणे हा एक विक्रमच आहे.

दोन दिवस मध्यम पावसाची शक्यता

गेल्या २४ तासांत राज्यात सांगेत ६.५ मिमी, मडगाव ४ मिमी, पेडणे ३.४ मिमी तर जुने गोवे आणि काणकोण येथे तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: 19 एप्रिलनंतर 'या' राशीसाठी शुभ संकेत! व्यवसाय-नोकरीत प्रगतीची संधी, पण गुंतवणुकीसाठी 'अलर्ट'

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

SCROLL FOR NEXT