Goa Pre-Monsoon Work Dainik Gomantak
गोवा

Pre-Monsoon Work: मान्सूनपूर्व कामे त्वरित पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; हेल्पलाईनबाबत रोहन खवंटे म्हणाले...

मान्सूनपूर्व कामांच्या तयारीबाबत पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी काल (शुक्रवारी) शासकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दैनिक गोमन्तक

Goa Pre-Monsoon Work: सध्या राज्यभरात मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. या कामांचा कालावधी संपत आला तरी अद्याप ही कामे पूर्ण न झाल्याने नागरिकांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत सरकारी यंत्रणा आता जास्तच सक्रिय झाली असून ही कामे लवकर पूर्ण होण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. मान्सूनपूर्व कामांच्या तयारीबाबत पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी काल (शुक्रवारी) शासकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

विधानसभा संकुलात झालेल्या या बैठकीला जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग आणि अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चर्चेदरम्यान मंत्री खवंटे यांनी पंचायतींच्या अधिकाऱ्यांना आणि जलसंपदा विभागाच्या (डब्ल्यूआरडी) अधिकाऱ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले, गटारे आणि नाल्यांचे गाळ काढण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना केल्या, तसेच ही कामे त्वरित होण्यासाठी लक्ष घालण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

पीडब्ल्यूडी, वीज, अग्निशमन, आपत्कालीन सेवा आणि इतर संबंधित विभागांमार्फत करायच्या कामांच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय, खवंटे यांनी सर्व संबंधित विभागांना त्यांची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत .

यावेळी ते म्हणाले की, आम्ही खबरदारीची उपाययोजना म्हणून हेल्पलाईन सक्रिय करणार आहोत. सोशल मीडिया आणि स्थानिक चॅनेल्सच्या माध्यमातून हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनादरम्यान नागरिकांना संपर्क करण्यात येणार आहे.

आम्ही राज्य आपत्ती प्रतिसाद योजना देखील सक्रिय करणार आहोत. पोलिस विभाग आधीच सज्ज असून अग्निशमन सेवेनेही योजना तयार केली असल्याचे मंत्री रोहन खवंटे यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT