Goa News | Cardinal Filipe Neri Ferrao Dainik Gomantak
गोवा

Goa News: कार्डिनल फिलीप नेरी फेर्रांव यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

Goa News: प्रत्येक धर्म समान तसेच देशातील सार्वभौमत्व व एकात्मता ही गोव्यात चांगल्या प्रकारे दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: जगात आपली पहिली ओळख भारतीय नागरिक आहे. धर्म, संस्कृती तसेच भाषा या देशात कुटुंबाप्रमाणे नांदत असतात. सर्वजण एकमेकांच्या सणांमध्ये जात-पात न पाहता सहभागी होतात हा आपल्या देशातील लोकांचा मोठेपणा आहे. त्यामुळे सर्व धर्माच्या नेत्यांनी एकतेचा मौल्यवान खजिना राखून ठेवणे गरजेचे आहे, असे मत कार्डिनल फिलीप नेरी फेर्रांव यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

दोनापावला येथील राजभवनातील जुन्या दरबार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्डिनल फिलीप नेरी फेर्रांव यांचा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो तसेच श्री श्री सद्‍गुरू भाऊ महाराज उपस्थित होते.

गोव्याचे बिशप असलेल्या फेर्रांव यांना कार्डिनलपदी बढती मिळाल्याने हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फेर्रांव पुढे म्हणाले की, मला बढती देण्यात आल्याने माझी आणखी जबाबदारी वाढली आहे.

धर्मांमध्येही एकात्मता हवी: राज्यपाल

देशात सर्वधर्म समभाव ही भावना अजूनही काही भागात अवलंबण्यात आलेली नाही. घटनेत सर्व धर्म, जात - पात तसेच भाषा व संस्कृतीला समानता आहे. धर्माचा अर्थ प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीने घ्यायला हवा. प्रत्येक धर्म समान तसेच देशातील सार्वभौमत्व व एकात्मता ही गोव्यात चांगल्या प्रकारे दिसत आहे. धर्मांमध्येही एकात्मता हवी, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले.

'गोव्यात शांतता आणि बंधुत्व'

गोव्यात आम्ही शांततेने तसेच बंधुत्वाने राहतो. समाजाला मार्गदर्शन करण्याचे मोठे काम धर्मगुरूंचे आहे. फिलीप नेरी फेर्रांव हे 2004 पासून बिशप होते. तेव्हापासून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे तसेच मार्गदर्शनाचे काम केले आहे.

तसेच, त्यांनी समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळेच तर त्यांना कार्डनिल या पदावर बढती मिळाली आहे. त्यांचा आशीर्वाद नेहमीच गोव्यातील समाजावर असेल, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT