Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

New Project in Pernem: पेडणे तालुक्यातील वीज व्यवस्थेत वर्षभरात सुधारणा, ढवळीकरांनी दिली ग्वाही; 100 कोटींच्या प्रकल्पाचा शुभारंभ

Sudin Dhavalikar: वर्षभरात पेडणे तालुक्यातील सर्व सबस्टेशनचे आधुनिकीकरण करून लोकांना चांगली सेवा उपलब्ध करण्यात येईल, असे प्रतिपादन वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: जनतेच्या सहकार्यामुळेच वीज खात्यात आज आमूलाग्र बदल होत आहेत. भाऊसाहेब बांदोडकरांनी १९६५ सालात संपूर्ण राज्यात विजेचे जाळे विणले. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली वीज क्षेत्रात मोठी सुधारणा घडवून आणण्याची संधी मिळत आहे. वर्षभरात पेडणे तालुक्यातील सर्व सबस्टेशनचे आधुनिकीकरण करून लोकांना चांगली सेवा उपलब्ध करण्यात येईल, असे प्रतिपादन वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

येथील गोवा बागायतदार सभागृहात आयोजित केलेल्या वीज खात्याअंतर्गत पेडणे तालुक्यात १०० कोटी रुपये खर्चून भूमीगत वीज वाहिन्या घालण्याच्या प्रकल्पाचे डिजिटल पद्धतीने बटन दाबून पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार प्रवीण आर्लेकर, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, सीमा खडपे, मनोहर धारगळकर, नगराध्यक्ष मनोज हरमलकर , वीज अभियंता विल्यम जे. बार्रेटो, विभागीय कार्यकारी अभियंता वाटू सावंत आदी उपस्थित होते. ढवळीकर यांनी पुढे सांगितले की, पेडणे तालुक्यातील ११ केव्ही व ३३ केव्ही भूमीगत वाहिन्यांचे काम तीन महिन्यांत पूर्ण होइल. नगराध्यक्ष मनोज हरमलकर यांचेही समयोचित भाषण झाले.

विकासकामांना सहकार्य करा

आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने पेडणे मतदारसंघात झपाट्याने विकास होत आहे. भूमीगत वीज वाहिन्यांमुळे पेडणे तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. त्यामुळे विकासकामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Horoscope:भाग्याचा तारा चमकणार! 'या' राशींना मिळणार सुखाची बातमी, वाचा तुमचे भविष्य!

Goa Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! वाळपईत महिलेचं अपहरण करुन नराधमानं केलं निंदनीय कृत्य

SCROLL FOR NEXT