Goa power department engineer commits suicide  Dainik Gomantak
गोवा

गोवा वीज खात्याच्या अभियंत्याने केली आत्महत्या

विवाहित असलेले आंतोनिओ कार्व्हाल्हो हे मिरामार येथील शालोम या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: वीज खात्यामध्ये (Goa Goa power department) सहाय्यक अभियंता (engineer) असलेल्या आंतोनिओ कार्व्हाल्हो (वय 53) यांनी आज दुपारी 12.30 च्या सुमारास ते राहत असलेल्या मिरामार (Miramar) येथील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी पणजी पोलिसांनी (Panaji Police) अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुदेश नाईक यांनी दिली.

विवाहित असलेले आंतोनिओ कार्व्हाल्हो हे मिरामार येथील शालोम या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. कौटुंबिक समस्येमुळे त्यांची पत्नी व मुले वेगळी रहात होती. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते.

पणजी वीज कार्यालयात ते आज कामावर गेले नव्हते. त्यांनी रहात फ्लॅटचे दार बंद करून ते सहाव्या मजल्यावर गेले व तेथून त्यांनी खाली उडी घेतली. या घटनेमुळे इमारतीखाली मोठा आवाज झाल्याने इमारतीमधील इतर फ्लॅटमधील लोकांनी खाली पाहिले असता कार्व्हल्हो हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पणजी पोलिसांना दिली. पंचनामा करून त्यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आला. या घटनेसंदर्भातची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT