Goa Power Consumption Dainik Gomantak
गोवा

Goa Power Consumption: घरगुती वीज वापरात गोवा अव्वल; आसाममध्ये सर्वात कमी वापर...

पुण्यातील प्रयास संस्थेच्या अभ्यासातील निष्कर्ष

Akshay Nirmale

Goa Power Consumption: घरगुती वीज वापरात गोवा देशात अव्वल राज्य ठरले आङे. गोव्यात एका महिन्यात सरासरी 263 kWh वीज वापरली जाते. हे प्रमाण आसाममधील सरासरी घरगुती वापराच्या पाचपट जास्त आहे. आसाममध्ये सर्वात कमी वीजवापर आहे.

ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक हितसंबंधित संशोधन करणाऱ्या पुण्यातील प्रयास या संस्थेने केलेल्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. दरम्यान, 2012-2022 या काळात भारताचा एकूण देशांतर्गत ऊर्जेचा वापर 171 अब्ज युनिट्सवरून 340 अब्ज युनिटपर्यंत वाढला आहे.

या अभ्यासात म्हटले आहे की, औद्योगिक आणि घरगुती क्षेत्रे देशातील वीज वापरातील वाढीचे मुख्य चालक आहेत. दरम्यान, वीजेच्या अतिरिक्त मागणीमध्ये उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा वाटा जवळपास ५० टक्के होता.

बिहारमध्ये विजेच्या वापरात नाट्यमयरित्या वाढ झाली आहे. तिथे 2022 मध्ये कुटुंबाचा सरासरी वीजवापर 2012 पेक्षा सहापट जास्त झाला आहे.

मध्य प्रदेश आणि ओडिशामध्येही घरगुती वीजवापर दुप्पट झाला आहे, तर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2012 ते 2022 दरम्यान 200 टक्के वाढ झाली आहे.

2012 ते 2022 या काळात देशांतर्गत वीज वापराने वार्षिक 7.1 टक्के वाढीचा सर्वोच्च दर नोंदवला आहे. तर 2012-22 या दशकात उद्योगांकडून सर्वाधिक अतिरिक्त वीज मागणी झाली आहे.

2012-2022 या कालावधीत औद्योगिक क्षेत्राचा अतिरिक्त वीज मागणीतील वाटा 39 टक्के होता. घरगुती वापरकर्त्यांचा वाटा 32 टक्के होता आणि कृषी वापराचा वाटा 2012-2022 दरम्यान अतिरिक्त मागणीच्या 16 टक्के होता.

औद्योगिक वीज वापरात अनुक्रमे गुजरात, ओडिशा, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि छत्तीसगड ही टॉप राज्ये आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cutbona Jetty: कुटबण जेटीवर अस्वच्छतेचे साम्राज्य! आरोग्य खात्याच्या पाहणीत अनेक त्रुटी उघड; पाणीपुरवठ्या अभावी कामगारांचे हाल

म्हापसा नालेसफाईचा केवळ फार्स? पावसाळ्यापूर्वी प्रशासनाचा चालढकलपणा; नाल्यातील गाळ काठावरच ठेवल्यानं 'टुगेदर फॉर म्हापसा' संघटनेचा संताप

Goa Assembly Elections 2027: सासष्टीचा 'तो' बालेकिल्ला काँग्रेस पुन्हा जिंकणार? 2027 कडे सर्वांचे लक्ष; नुवे, बाणावली, कुडतरी आणि वेळ्ळी मतदारसंघांत पुन्हा एकदा चुरशीची लढत

Shocking News: रागाचा झटका बेतला जिवावर! स्वतःचा प्रायव्हेट पार्ट कापून देवाला केला अर्पण; बायकोसोबतच्या वादातून 25 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT