Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Unseasonal Rain: राज्यात अवकाळीची हजेरी! भात शेतीला फटका बसल्याने बळीराजा चिंतेत; हवामान खात्याचा आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज

goa unseasonal rain paddy crop damage: वादळी वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाली. अवकाळी पावसाचा फटका काढणीवर आलेल्या भातपिकावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सोमवारी दुपारनंतर राज्यभर मान्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली, त्यामुळे ‘ऑक्टोबर हिट’मुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात विक्रेत्यांची आणि नागरिकांची पळापळ झाली. तसेच वादळी वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाली. अवकाळी पावसाचा फटका काढणीवर आलेल्या भातपिकावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजधानी पणजी परिसरात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. पणजी परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले, त्यामुळे पावसाचा अंदाज बांधला जात होता. मंगळवारी दसऱ्यामुळे झेंडूची फुले विक्रीसाठी रस्त्याच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्यांची पावसामुळे (Rain) धावपळ झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असता, तर फुलांच्या विक्रीवर परिणाम झाला असता; पण काही वेळाने पाऊस थांबल्यानंतर फूल खरेदीदार दिसू लागले.

हवामान खात्याने आणखी दोन दिवस कुशावती जिल्ह्यासह उत्तर गोव्यातील काही भागांत पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तविला आहे. पेडणे तालुक्यात संध्याकाळी चारच्या सुमारास अचानक गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास कोसळलेल्या या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली.

भात शेतीला फटका

सावईवेरे, वळवई व केरी पंचक्रोशीत दुपारी पावसाने हजेरी लावली. दुपारी अडीचच्या सुमारास गडगडाटासह सुरू झालेला वादळी पाऊस सुमारे एका तासाहून अधिक काळ सुरू होता. काही ठिकाणी भात शेतीला फटका बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Voter List Revision: मतदारयादीतून नावे वगळलेल्या हजारो मतदारांना दिलासा; फॉर्म 6 भरण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदत!

Goa Politics: गोवा देशासाठी विकासाचे मॉडेल! मुख्‍यमंत्र्यांचे राहुल गांधींना खणखणीत प्रत्‍युत्तर, म्हणाले, 'ही यात्रा नव्हे तर जत्रा'

Horoscope 20 Oct 2026: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर धनलाभाचा उत्तम योग! नोकरी-व्यवसायातून मिळणारा आर्थिक लाभ वाढवणार संपत्ती; मेहनतीचे मिळणार गोड फळ

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

SCROLL FOR NEXT