Porvorim Crime:
Porvorim Crime: Dainik Gomantak
गोवा

Porvorim Crime: प्रभू श्री रामांचे पोस्टर फाडणारा अवघ्या काही तासांत पर्वरी पोलीसांच्या ताब्यात

Ganeshprasad Gogate

Porvorim Crime: पर्वरीत सार्वजनिक ठिकाणी अयोध्येत होणाऱ्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची माहिती देणारे पोस्टर अज्ञात व्यक्तीने फाडल्याची घटना घडली होती. पोस्टर फाडल्याने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र पोस्टर फाडणारा व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी तपास वेगाने सुरु केला होता. पोलिसांच्या तपास कामाला यश आले असून अवघ्या काही तासात पोस्टर फाडणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सादीक असे या पोस्टर फाडणाऱ्याचे नाव असून 29 वर्षांचा आहे.

सादीक हा सध्या कळंगुट येथे राहत असून तो मूळ बदापूर, तेडीबाजार मोहल्ला, उत्तर प्रदेश येथील असल्याचे समजतेय.

पर्वरी पोलीसांकडून मिळालेलय माहितीनुसार अयोध्येतील राम मंदिरातील स्थापनेच्या कार्यक्रमाचे मोठे बॅनर पर्वरी परिसरात लावण्यात आले होते. मात्र अज्ञात व्यक्तीने त्यातील एक बॅनर फाडल्याने शुक्रवारी सकाळपासूनच परिसरात तणाव निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अनेक शोध पथके तयार करत परिसरातील सुमारे 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. या तपासणीत पोलिसांना बॅनर फाडणारा व्यक्ती स्पष्टपणे आढळून आला. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत घटनेचं छडा लावला.

या कामगिरीमध्ये पोलीस पथकातील पीएसआय वामन नाईक, पीएसआय मंदार परब, पीएसआय सर्वेश जी. भंडारी, एएसआय उमेश पावस्कर, महादेव नाईक, तुषार राऊत, सिद्धेश नाईक, नितेश गावडे, उत्कर्ष देसाई आणि वैभव कांबळी या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

SCROLL FOR NEXT