Goa Fire News | Santacruz  Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: पोर्तुगीजकालीन घराला आग; सांताक्रुझमध्ये किमती लाकडी सामानासह नुकसान

दोन तास आगीशी झुंज दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आटोक्यात आणली

दैनिक गोमन्तक डिजिटल

सांताक्रुझ येथील पोर्तुगीजकालीन बंद घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना 3 मार्च संध्याकाळी 5 च्या दरम्यान घडली. दोन तास आगीशी झुंज दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ती आटोक्यात आणली.

या आगीत घरातील पोर्तुगीजकालीन जुने लाकडी सामान व वस्तू तसेच घराच्या छप्पराचे सामान खाक झाले. ही आग विझवण्यासाठी तीन पाण्याचे बंब वापरण्यात आल्याची माहिती पणजीचे अग्निशमन स्थानकाचे अधिकारी दिलीप गावस यांनी दिली.

हे घर मिनेझिस वाझ यांचे असून ते बंद होते. घरातून धूर येऊ लागल्याने शेजारी असलेल्या घरातील लोकांनी तसेच स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिली. लोकांनी या घराचे बंद असलेले टाळे तोडून हीआग विझविण्याचा प्रयत्न केला.

साहित्य खाक

पोर्तुगीजकालीन घर असल्याने ते लाकडी सामानाचे होते. घराचे छप्पर हे लाकडी सामानावर होते तसेच घरात किंमती जुने लाकडी सामान होते. घरातील सर्व खोल्यांमधील सामान आगीत खाक झाले आहे. या आगीमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

वीज खात्याशी यासंदर्भात संपर्क साधण्यात आला आहे. या आगीत किती नुकसान झाले याचा अंदाज व्यक्त करता येत नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT