Goa News | Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: देशभरात चोऱ्या करणारा अखेर गोव्यात जेरबंद

Goa Crime: फोंडा, पणजी, पर्वरीसह इतर चोऱ्यांप्रकरणी तो वॉन्टेड होता.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यांत पर्यटक बनून धाडसी चोऱ्या करणारा संतोष कुमार (42, रा. ओडिशा) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. फोंडा, पणजी, पर्वरीसह इतर चोऱ्यांप्रकरणी तो वॉन्टेड होता. त्याला पणजी पोलिसांनी रविवारी जेरबंद करून आज फोंडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

ऑगस्ट महिन्यात खांडोळा येथील महागणपती मंदिरात चोरी करून दहा ते बारा लाखांचा ऐवज लंपास झाला होता. या प्रकरणी संतोष कुमारने चोरीची कबुली दिली आहे. दरम्यान, गोव्यात तसेच इतर राज्यात चोरीच्या उद्देशाने गेल्यानंतर त्याचे वास्तव्य एखाद्या स्वस्त हॉटेलात असायचे. दहा वर्षांपूर्वीही त्याने म्हापसा येथे एका मंदिरात चोरी केली होती.

मंदिरांची टेहळणी

चोरीपूर्वी संतोष कुमार मंदिराची टेहाळणी करायचा. भाड्याच्या टॅक्सीने चांगले कपडे घालून तो येत असल्याने कुणालाही तो पर्यटक असावा असे वाटायचे. मात्र, रात्र झाल्यावर तो चोरी करून मोकळा व्हायचा व ज्या टॅक्सीवाल्याने त्याला आणून सोडले होते, त्यालाच तो न्यायला पहाटे बोलवायचा आणि हॉटेलवर चोरीच्या मुद्देमालासह जायचा. त्यामुळे कुणालाच त्याचा संशय येत नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

निवृत्तीआधी रोहित शर्मानं पूर्ण करावं 'हे' मोठं टार्गेट; गावस्करांचा हिटमॅनला मोलाचा सल्ला, म्हणाले- "आता जबाबदारी समजून खेळ..."

Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

SCROLL FOR NEXT