Ponda News| Goa News Dainik Gomantak
गोवा

Ponda News: रविवारी फोंड्यात तिसावे रंगसंमेलन, राजीव गांधी कलामंदिरात प्रथमच आयोजन

Ponda News: राजदत्त यांना जीवनगौरव : अनुपम खेर यांची उपस्थिती

दैनिक गोमन्तक

Ponda News: चतुरंग प्रतिष्ठानचे यंदाचे तिसावे रंगसंमेलन येत्या रविवारी 4 डिसेंबर रोजी फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. या रंगसंमेलनाची माहिती पत्रकार परिषदेतून विद्याधर निमकर यांनी दिली. श्रीकुमार सरज्योतिषी, डॉ. दत्ताराम देसाई व गुरुनाथ टेंगसे आदी उपस्थित होते. रविवारी संध्याकाळी चार वाजता या रंगसंमेलनाला सुरुवात होणार आहे.

या रंगसंमेलनात चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अभिनेते अनुपम खेर उपस्थित राहणार आहेत. या रंगसंमेलनात सुरुवातीच्या सत्रात अभिनेते मनोज जोशी यांच्या खंडप्राय मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.

सचिन चाटे हे मुलाखत घेतील. त्यानंतर स्मरणिका प्रकाशन सोहळा होईल. या कार्यक्रमाला उदघाटन म्हणून स्टेट बँकेच्या विमा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद पेजावर तर स्वागताध्यक्ष म्हणून माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर उपस्थित राहणार आहेत.

स्मरणिकेसंबंधी प्रा. अनिल सामंत बोलणार असून प्रकाशक जनार्दन वेर्लेकर यांची उपस्थिती कार्यक्रमाला असेल. गोव्यात आतापर्यंत तीनवेळा हा पुरस्कार वितरण सोहळा झाला असून फोंड्यात प्रथमच हे रंगसंमेलन भरणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका विनामूल्य असल्या तरी त्यासाठी आगाऊदोनशे रुपये शुल्क आकारले जातील. प्रेक्षकांना सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी ही रक्कम परत केली जाईल.

प्रवेशिका उपलब्ध :

आसन व्यवस्थेच्या सुविहितपणासाठी ही संकल्पना आखण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रवेशिका फोंड्यात रंगरचना स्टेट बँकेसमोर, पणजी पारिजात कॉस्मेटिक्स हिंदू फार्मसीजवळ, मडगाव शिकेरकर एजन्सी कोंब, साखळी सुविधा भांडार या ठिकाणी उपलब्ध असतील, असे निमकर यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते राजदत्त यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी अनुपम खेर, पत्रकार विजय कुवळेकर, निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, मानपत्र वाचक प्रमोद पवार उपस्थित राहतील. शेवटच्या सत्रात पं. भीमसेन जोशी - गाणी आणि आठवणी हा कार्यक्रम पुणे येथील आनंद भाटे सादर करणार आहेत. त्यात डॉ. अजय वैद्य यांचा सहभाग असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT