Farming | Goa News  Dainik Goamantak
गोवा

Goa Agriculture: बागायतीत आंतरपिकातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

Goa Agriculture: निरंकालमध्ये सामंत यांचे प्रयोग : नैसर्गिक आपत्तींवर मात

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: आज पुष्कळ शेतकरी शेती करतात; पण योग्य नियोजन न केल्याने तोट्यात येतात. अशा शेतकऱ्यांनी शेती-बागायतीचा फायदा करून घ्यायचा असेल तर त्यांनी आंतरपीक घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा यशाचा मंत्र निरंकाल येथील हेमंत सामंत यांनी दिला आहे. आंतरपीक घेतल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळू शकते, असेही सामंत यांनी सांगितले.

आंतरपिकाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणारे निरंकाल येथील प्रयोगशील शेतकरी हेमंत सामंत म्हणाले, की निरंकाल गावात वडिलोपार्जित बागायती आहे. या जमिनीत पहिल्यांदा सुपारी व नारळाची झाडे लावली.

सुपारीची झाडे मोठी झाल्यानंतर चांगले उत्पन्न मिळू लागले. गेली पन्नास-साठ वर्षांपासून आम्ही मिरीचे पीक घेतो. पण दोन वर्षांपूर्वी मिरीला कोणता तरी रोग लागला आणि मिरीच्या वेली सुकत गेल्या. आम्हाला दरवर्षी 1 टन मिरी मिळत होती. पण रोग लागल्यामुळे त्या वर्षी आम्हाला अर्धा टन मिरी मिळाली. आमचे मोठे नुकसान झाले.

गोव्यात या रोगावर संशोधन सुरू आहे; पण त्यात यश मिळालेले नाही. युवकांनी सरकारी नोकरीमागे न धावता वडिलोपार्जित जमीन कसून आर्थिक उत्कर्ष साधावा, असेही सामंत म्हणाले.

कर्नाटकातील मिरीचा प्रयोग

कर्नाटकातील शेतकऱ्यांनी इफळी या रानटी वेलीपासून मिरीची कलमे तयार केली आहेत. ही सुमारे साडेआठ हजार मिरीची कलमे आम्ही बागायतीत लावली. तेव्हापासून मिरीचे मोठे उत्पादन होते, असे सामंत यांनी सांगितले.

कवाथ्यांना मोठी मागणी

तांबडी केळी, लिंबूची झाडे, बिंबल, चिकू, पपई, सावरबोणी केळी, अननस अशी आंतरपिके घेतली जातात. त्यामुळे आर्थिक स्रोत उपलब्ध झाला आहे. बाणावलीतून आम्ही नारळ आणून त्याचे कोंब काढून नारळाच्या कवाथ्यांची विक्री करतो. दोन वर्षांच्या नारळाच्या झाडाला सहाशे रुपयांपर्यंत दर मिळतो, असे सामंत यांनी सांगितले.

योजना अनेक; पण लाभ शून्य :

ग्रामीण भागात बागायतींचे रानटी जनावरांकडून मोठे नुकसान होते. गवे, वानर, मोर, डुक्कर शेतीची मोठी नासाडी करतात. सरकार दरबारी संरक्षक कुंपणासारख्या योजना आहेत. पण जमीन नावावर नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळत नाही.

त्यामुळे शेतकरी उदासीन होतात. अनेकांनी बागायती कसणे सोडून दिले, अशी खंत सामंत यांनी व्यक्त केली. राज्यात हरित क्रांती घडवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT