Easy Toilet | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: विकासकामांच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न!

Goa News: प्रिया च्यारी : कुर्टीत सुलभ शौचालय सुविधेचे लोकार्पण

दैनिक गोमन्तक

Goa News: जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून विकासकामे पूर्ण करताना नागरिकांना चांगले ते देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही कुर्टीच्या जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी यांनी दिली. नागझर - कुर्टी येथे आज (गुरुवारी) जिल्हा पंचायतीच्या निधीतून सुलभ शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असून उद्घाटन केल्यानंतर प्रिया च्यारी बोलत होत्या.

यावेळी मगो पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर, कुर्टी - खांडेपारचे सरपंच नावेद तहसीलदार, उपसरपंच विल्मा परेरा, पंचसदस्य नीळकंठ नाईक, परवीन बानो व स्थानिक पंचसदस्य बाबू च्यारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

केतन भाटीकर म्हणाले की, जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत लोकांना दिलेली आश्‍वासने पूर्ण होत आहेत. प्रिया च्यारी यांच्या कामाच्या धडाक्यामुळे अनेक कामे पूर्णत्वास येत असून पुढील काळात कामाची व्याप्ती वाढवली जाईल, असे त्यांनी सांगितले. स्वागत, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रतिभा नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT