Bison Attack In Ponda Dainik Gomantak
गोवा

Bison Attack: फोंड्यात रानगव्याचा थरार! बेतोडा जंक्शनजवळ होमगार्डवर जीवघेणा हल्ला; 48 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bison Attack In Ponda: गोव्यातील फोंडा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

फोंडा: गोव्यातील फोंडा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बेतोडा जंक्शन परिसरात रानगव्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका ४८ वर्षीय होमगार्डला आपला जीव गमवावा लागला आहे. दिनेश तुळशीदास गावडे असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण फोंडा तालुक्यात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. मानवी वस्तीजवळ रानगव्याने केलेल्या या हल्ल्यामुळे वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश गावडे हे होमगार्ड म्हणून कार्यरत होते. ते बेतोडा जंक्शनच्या परिसरातून जात असताना अचानक एका रानगव्याने त्यांच्यावर झडप घातली. दिनेश यांनी रानगव्याला कोणत्याही प्रकारे डिवचले नव्हते किंवा त्याला त्रास दिला नव्हता. मात्र, तरीही या रानगव्याने अचानक चवताळून त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दिनेश यांना गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.

परिसरात दहशतीचे सावट

बेतोडा जंक्शन हा भाग वर्दळीचा असून, तिथे अशा प्रकारे रानगव्याने हल्ला केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रानगवे आता थेट मुख्य रस्त्यांपर्यंत आणि मानवी वस्तीपर्यंत येऊ लागल्याने लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. वन विभागाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून अशा हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

वन विभागाच्या भूमिकेकडे लक्ष

दिनेश गावडे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वन विभाग आता या रानगव्याचा शोध घेऊन त्याला सुरक्षितरीत्या जंगलात परत सोडणार की दुसरी काही उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT