Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Advalpal-Thivim Mining : वार्षिक 3 लाख मेट्रिक टन खनिज उत्खननाला ‘प्रदूषण’ची परवानगी; अटी शर्तींचं करावं लागणार पालन

Goa State Pollution Control Board: अडवलपाल-थिवी खाणपटट्यात वार्षिक ३ लाख मेट्रिक टन खनिज काढण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्प स्थापन करण्यास परवानगी दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Advalpal-Thivim News: अडवलपाल-थिवी खाणपटट्यात वार्षिक ३ लाख मेट्रिक टन खनिज काढण्यासाठी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्प स्थापन करण्यास परवानगी दिली आहे.

अडवलपाल येथील २२ (पी), २८ (पी), २९ (पी), १०९ (पी), ११० (पी), १११ (पी), ११२ (पी), ११६ (पी), ११७ (पी), ११८ (पी), ११९ (पी), १२०, १२१, १२२ (पी), १२३ (पी), १२४ (पी), १२५ (पी), आणि १२६ (पी) आणि थिवीच्या ८६ या सर्वे क्रमांकाच्या जमिनीत हे खाणकाम केले जाणार आहे. संबंधित कंपनीला प्रतितास २५० टन क्षमतेचा मोबाईल स्क्रीनिंग प्लांट आणि प्रतितास १२५ टन क्षमतेचा मोबाईल क्रशिंग प्लांट बसवण्यासही मंडळाने मान्यता दिली आहे.

प्रकल्पातून दरदिवशी ६.४ किलोलीटरपेक्षा जास्त घरगुती सांडपाणी सोडता येणार नाही, अशी अट घातली आहे. औद्योगिक सांडपाणी १६ किलोलीटरपेक्षा जास्त असता कामा नये, असेही या परवानगी देतानाच्या पत्रात नमूद केले आहे. सांडपाण्यातून तेल व ग्रीस वाहून जाऊ नये, याची दक्षता घेणेही बंधनकारक केले आहे.

पावसाळ्‍यात पाणी वाहून खाणीबाहेर जाऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी. एरव्हीच्या दिवसांत धूळ प्रदूषण टाळण्यासाठी नियमित पाणी फवारणी करण्याची व्यवस्था करावी. शेजारील गावांची तहान भागवावी. रेवोडा, अडवलपाल, थिवी, पीर्ण व शिरसई येथे भूजल पातळीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. खाणीतून खेचण्यात येणाऱ्या पाण्याच्या नोंदी ठेवाव्यात. यात किती पाणी खेचले, पंप केव्हा सुरू केला, बंद केव्हा केला, किती वेळ पंप सुरू राहिला, पंपाची क्षमता काय आदी तपशील अपेक्षित आहे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

खाणीवर बसवण्‍यात येणारी १० व ५० किलोवॅटची जनित्रे दोन मीटरपेक्षा जास्त उंचीवर बसवू नयेत. १० किलोवॅटच्या जनित्रासाठी तासाला दीड लीटर तर ५० किलोवॅटच्या जनित्रासाठी तासाला ८ लीटर इंधन वापरता येईल, असे मंडळाने कंपनीला कळविले आहे. थिवी व अडवलपाल येथे हवेची गुणवत्ता मोजली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

गोवा

अनेक अटी लागू

ट्रक वाटेत बंद पडल्यास रस्त्याशेजारी खनिज ओतता येणार नाही. रस्त्यांवर सातत्याने पाणी शिंपडत राहिले पाहिजे. टाकाऊ मातीवर वृक्षारोपण केले जावे. रस्त्यावर सांडलेले खनिज त्वरित हटवावे. खनिज वाहतुकीची माहिती कुठून कुठे वाहतूक, किती आकार, किती फेऱ्या, मार्ग आदी तपशीलांसह द्यावी, अशी अटही परवानगी देताना घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: विश्वविक्रम! अभिषेक शर्माने रचला इतिहास, टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावांचा टप्पा पार

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

Tamarind Tree: राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर प्रथम जिथे झोपडी बांधून राहिले असा, गुणधर्माने देवपण लाभलेला 'चिंच वृक्ष'

SCROLL FOR NEXT