Goa Pollution Board Issues Notices to Non-Compliant Industries  Dainik Gomantak
गोवा

Goa Pollution Control Board: रितसर परवाने घ्या, नाही तर व्यवसाय बंद करा; प्रदूषण मंडळाची तंबी!

Environmental Regulations: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आता कठोर कारवाईसाठी सज्ज झाले आहे. आजवर दुर्लक्षित ठेवलेल्या छोट्या-मोठ्या आस्थापनांना मंडळाने लक्ष्य केले आहे.

Manish Jadhav

पणजी: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आता कठोर कारवाईसाठी सज्ज झाले आहे. आजवर दुर्लक्षित ठेवलेल्या छोट्या-मोठ्या आस्थापनांना मंडळाने लक्ष्य केले आहे. मंडळाकडून हवा व जल प्रदूषण कायद्यांतर्गत परवाने घ्या किंवा व्यवसाय बंद करा, अशा नोटीसा राज्यभरातील आस्थापने, उद्योग, गृह संकुलांना पाठवणे सुरु केले आहे.

पणजीतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवरील कारवाईतून ही सुरवात झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध आस्थापनांना पर्यावरणीय परवानग्या मिळविण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा बंदीची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. वैध परवानगीशिवाय कार्यरत आस्थापनांना तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

परवाने बंधनकारक

दरम्यान, 24 किंवा अधिक सदनिका असलेल्या निवासी इमारती, बेकरी युनिट्स, लॉन्ड्री सुविधा, पीठ गिरण्या, तांदूळ गिरण्या आणि सुतारकामाच्या कार्यशाळा यांचा यात समावेश आहे. याशिवाय, हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस, रिसॉर्टस, मोटेल्स, रेस्टॉरंट्स, वाहन धुण्याची केंद्रे, बँक्वेट हॉल्स, खुली मैदाने, लग्न हॉल्स, आरा गिरण्या आणि डेअरी, गोशाळा, कुक्कुटपालन केंद्रे आणि डुक्करपालन केंद्रे यांसारख्या कृषी सुविधा यांचा समावेश आहे. या श्रेणींमध्ये येणाऱ्या आस्थापनांना आता जल आणि हवेच्या प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत ‘संस्थापनासाठी संमती’ आणि ‘कार्यान्वयनासाठी संमती’ मिळविणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT