GPCC Mahila at Delhi (Goa Politics) Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ...त्यामुळे महिलांनी जबाबदारी घेऊन भाजपला पराभूत करण्यासाठी पुढे यावे

भाजपच्या सरकारवर 'भारताची अर्थव्यवस्था कमजोर केल्या'चा आरोप

Dainik Gomantak

Goa Politics: भारत आणि भारताचे काळीज जसे नाजूक आहे तशीच भारताची अर्थव्यवस्थाही नाजूक असल्याचे पं. नेहरु (Former PM Pt. Jawaharlal Nehru) नेहमीच सांगत होते. मात्र विद्यमान भाजपच्या सरकारने (BJP Govt) भारताचे काळीज काढून घेतलेय व भारताची अर्थव्यवस्था कमजोर केली आहे. कॉंग्रेसच्या (Congress Govt) काळात महिलांकडे काही पैसे शिल्लक रहायचे . आता महागाईमुळे (Inflation in the BJP government) महिलांकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे महिलांनी जबाबदारी घेऊन भाजपला पराभूत करण्यासाठी पुढे यावे (Defeating the BJP) . तसेच कॉंग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या (GPCC) अध्यक्ष बीना नाईक यांनी केले. (GPCC Mahila President Beena Naik)

दिल्ली येथे आज आयोजित महिला कॉंग्रेसच्या ३८ व्या स्थापन दिन सोहळ्यात गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक यांच्या नेतृत्वाखाली २२ महिला पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मोजक्याच प्रदेश अध्यक्षांना बोलण्याची संधी मिळाली. त्यात बीना नाईक यांना संधी मिळाल्यानंतर त्यांनी वरील आवाहन केले. कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते राहूल गांधी व इतरांनी या दिवसभराच्या सोहळ्यात मार्गदर्शन केले. बीना नाईक यांच्यासह डोरीस तेराझा, सई वळवईकर, पेलाजिया पेरीस, रोशन देसाई, लिबेरीता मेंडेरीया, सुजाता चौगुले, धनश्री प्रभू, रुक्मीणी जोसलकर, रेणुका देसाई, मंजुरीना शेख, स्नेहा फोंडेकर, आर्लींडा लाकेर्डे, प्रतिभा ढगे, रेनिता फर्नांडिस, मारिया वेरेला, रेखा परब, खुशभू ब्लेगन, रोशाल फर्नांडिस, अमिना शेख, प्रतिक्षा देसाई व नुरजहा शेख यांचा दिल्लीत गेलेल्या महिला पदाधिकाऱ्यांत समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT