Manoj Parab Resign Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab Resign: राज्याच्या राजकारणात खळबळ! मनोज परब यांनी दिला 'आरजीपी'चा राजीनामा

Manoj Parab Resigns From RGP: गोव्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील तरुण आणि आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी'चे (RGP) अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य मनोज परब यांनी 'आरजीपी'चा राजीमाना देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी केवळ आरजीपीच्या अध्यक्षपदाचाच राजीनामा दिला नसून, पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणूनही ते बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले आहे. मनोज परब यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे गोव्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पणजीतील पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

मनोज परब यांनी पणजी येथील आरजीपीच्या मुख्य पक्ष कार्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण राजकारणाला रामराम ठोकणार असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी घेतलेल्या या अनपेक्षित निर्णयामुळे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांचे पाठीराखे यांना मोठा धक्का बसला आहे.

राजीनाम्यामागचे गूढ अद्याप कायम

मनोज परब यांनी आरजीपीचा राजीनामा का दिला? यामागील नेमके आणि ठोस कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असल्या, तरी अंतर्गत मतभेद किंवा वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे पाऊल उचलले का, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. गोव्यातील स्थानिक लोकांच्या हक्कासाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती, त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

आरजीपीच्या भविष्यातील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

'रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी'च्या स्थापनेपासूनच मनोज परब हे पक्षाचा मुख्य चेहरा आणि कणा राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गोव्यात आपली एक वेगळी मतपेढी तयार केली होती. आता त्यांनीच पक्षाला रामराम ठोकल्यामुळे आरजीपीच्या भविष्यातील वाटचालीवर आणि नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मनोज परब यांच्यानंतर पक्षाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार आणि आरजीपी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी होणार का, याकडे आता संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे. विरोधकांनीही या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवले असून, आगामी काळात गोव्याच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT