Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'आरजी' निर्नायकी; वीरेशचे अद्याप मौन, पुढील सूत्रे कुणाच्‍या हाती? कार्यकर्ते संभ्रमात, नेतृत्वाबाबत गूढ वाढले

Revolutionary Goans Party Leadership Vacuum: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाची धुरा आता कोणाकडे, या प्रश्नाचे उत्तर २४ तासानंतरही मिळू शकलेले नाही.

Sameer Amunekar

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाची धुरा आता कोणाकडे, या प्रश्नाचे उत्तर २४ तासानंतरही मिळू शकलेले नाही. निर्नायकी अवस्थेत सध्या हा पक्ष असून गेल्या १२ तासांत कोणीही जाहीर वक्तव्य न केल्याने गूढ वाढत चालले आहे.

पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्या अचानक राजीनाम्यानंतर तब्बल २४ तास उलटले, तरी पक्षाची पुढील सूत्रे कोणाच्या हाती जाणार याबाबत स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. ‘पोगो’ आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पक्षात आता नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बोरकर नेमके आहेत कुठे ?

आमदार वीरेश बोरकर यांची भूमिका सर्वाधिक चर्चेत आहे. पक्षाच्या भवितव्याबाबत बोलण्याची जबाबदारी नैसर्गिकरित्या त्यांच्यावर येते; मात्र ते अद्याप सार्वजनिकरीत्या मौन बाळगून आहेत.

ते नेमके कुठे आहेत? पक्षातील घडामोडींवर त्यांची भूमिका काय आहे आणि पुढील दिशा काय असणार, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

काहींच्या मते, पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असून नेतृत्वाच्या केंद्रीकरणाचा परिणाम दिसू लागला आहे. तर दुसरीकडे, काही कार्यकर्ते हा तात्पुरता धक्का असल्याचे सांगत पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा दावा करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT