Mickey Pacheco joins Congress (Goa Politics) Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मिकी पाशेको यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

काँग्रेसला परत सत्तेवर आणणे गरजेचे (Goa Politics)

सुशांत कुंकळयेकर

Margao: गोव्याचे माजी पर्यटनमंत्री (Former Tourism Minister) आणि नुवेचे माजी आमदार (Nuvem Former MLA) मिकी पाशेको (Mickey Pacheco) यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस पक्षात (Congress Party) प्रवेश केला. गोव्यात भाजपला (Goa BJP) हरवायचे असेल तर काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे काँग्रेस बळकट करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. इतरांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेस अधिक बळकट करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव (Congress Goa In charge Dinesh Gundu Rao) यांच्या उपस्थितीत आज त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपला प्रवेश बिनशर्त आहे. आणि अजून मी कोणत्याही मतदारसंघावर दावा केलेला नाही असे पाशेको यांनी सांगितले. (Goa Politics)

युगोडेपा, नंतर भाजप, राष्ट्रवादी, गोवा विकास पार्टी, गोवा सुराज पार्टी अशा चार पक्षातून आता पर्यंत प्रवास केलेल्या पाशेको यांनी आता काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. याबद्दल बोलताना पाशेको म्हणाले, गोव्यात काँग्रेसचे सरकार असताना सर्व लोकांना समान न्याय होता आणि सगळे सुखात होते. मात्र भाजपची सत्ता आल्यावर राज्यात दडपशाही सुरू केली. त्यामुळे काँग्रेसला परत सत्तेवर आणणे गरजेचे बनले असून काँग्रेस समोर इतर पक्ष फिके असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT