Goa Politics Dainik Gomantak
गोवा

'गोवा फॉरवर्डने' तृणमूलकडे का फिरवली पाठ?

म्‍हणून तृणमूलशी बोलणी बंद...

दैनिक गोमन्तक

मडगाव: राष्ट्रीय स्तरावर भाजपकडे तृणमूलने यशस्वी टक्कर दिल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आकृष्ट झालो होतो, ही गोष्ट जरी खरी असली तरी गोवा फॉरवर्ड पक्ष त्या पक्षात विलीन करावा, ही त्यांची अट आम्ही कोणत्याही परिस्थितीत मान्य करायच्या तयारीत नव्हतो. यासाठीच आम्ही ही बोलणी बंद केली, अशी माहिती काल गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी देतानाच ''गोयकारपण'' हे ब्रीद डोळ्यांसमोर ठेवून स्थापन केलेला हा पक्ष कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या पक्षात विलीन करणार नाहीत (Goa Politics), असे त्यांनी स्पष्ट केले.

फातोर्ड्यात शेतकऱ्यांना भाजीचे बियाणे आणि खते वितरित करण्यासाठी आज त्यांच्या कार्यालया जवळ कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, भाजपला शह देण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायला पाहिजे, असे मला अजूनही वाटते. अधिक पक्ष रिंगणात असल्यास मतविभागणीचा फायदा निश्चितच भाजपला जाणार आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत अशी युती व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू असेल त्यासाठी काही तडजोडी करायला लागल्या तर त्याही करायची आमची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाशी बोलणी चालू आहेत का? असे विचारले असता, काँग्रेस पक्षात आमचे अजूनही काही मित्र आहेत. त्यांनाही अशी युती व्हावी अशी वाटते, असे सरदेसाई म्‍हणाले.

... सगळेच चोर!

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे भ्रष्ट म्हटले नव्हते असा जो खुलासा केला आहे त्यावर सरदेसाई म्हणाले, राज्यपाल सत्य बोलतात. त्यांना एकटे मुख्यमंत्रीच चोर असे म्हणायचे नव्हते तर पूर्ण मंत्रिमंडळ चोरांचे असे म्हणायचे होते. गोव्यातील बीजेपी म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी असून त्यामुळेच हा भ्रष्टाचारी नरकासुराचा आम्हाला दिवाळीपर्यंत बंदोबस्त करायचा आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT