Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: काँग्रेस नेत्यांमध्ये कुठ्ठाळीत राडा! 'गेट आऊट' म्हणत नेत्याने गटाध्यक्षाला बदडले, सिमोईस यांच्या विरोधात तक्रार दाखल

Olencio Simoes assault case: कुठ्ठाळी काँग्रेस गट अध्यक्ष पीटर डिसोझा व काँग्रेस नेते ओलंसियो सिमोईस यांच्यामधील बैठकीतील वाद तसेच मारहाण प्रकरणाची चर्चा येथे रंगली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: कुठ्ठाळी काँग्रेस गट अध्यक्ष पीटर डिसोझा व काँग्रेस नेते ओलंसियो सिमोईस यांच्यामधील बैठकीतील वाद तसेच मारहाण प्रकरणाची चर्चा येथे रंगली आहे. मारहाण केल्याप्रकरणी पीटर डिसोझा यांनी वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.

दरम्यान, हा वाद आमच्यातील व्यक्तीगत कारणास्तव असल्याचे स्पष्टीकरण पीटर डिसोझा यांनी दिले आहे. मात्र झुआरीनगरातील काँग्रेस कार्यालयात हा वाद व मारामारीचा प्रकार घडल्याने काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशा प्रतिक्रिया येथे ऐकण्यास मिळत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सिमोईस यांनी झुआरीनगर येथे कार्यालयात मंगळवारी (ता. ३०) बैठक बोलाविली होती. या बैठकीला काही नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे पीटर यांना आमंत्रण दिले नव्हते. मात्र काहीजणांनी पीटर यांना माहिती दिल्यावर ते बैठकीच्या ठिकाणी आले.

आपण गटाध्यक्ष असतानाही आपणास का आमंत्रण नाही, तुम्हाला शिष्टाचार माहीत नाही काय अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर वाद वाढत गेला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काहीजणांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र पीटर यांनी एकामागून एक प्रश्न विचारण्यास आरंभ केल्यावर संतापलेल्या सिमोईस यांनी त्यांना ‘गेट आउट’ असे सुनावले.

त्यानंतर वाद वाढला. काहीजण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत असतानाच सिमोईस आपल्या जागेवरून उठले व त्यांनी पीटर यांना दोन तीन लाथा घालत ढकलले. पीटर यांना ढकल्याबद्दल तेथे उपस्थित असलेल्या काहींनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी पीटर यांनी पोलिस स्थानकात तक्रार केल्याने एकंदर घटना चर्चेत आली.

सिमोईस यांनी यापूर्वी भाजपातर्फे जिल्हा पंचायत, आप व काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक लढविली होती. पीटर हे माजी उपसभापती सायमन डिसोझा यांचे पुत्र आहेत. दोघांचा सामाजिक वावर आहे. स्थानिक प्रश्नांवर दोघेही आवाज उठवीत असतात. मात्र मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे त्या दोघांबरोबर काँग्रेस पक्षही चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pillion Helmet Rule: आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, रस्ते सुरक्षेसाठी मोठा निर्णय! टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

Goa Sealed Club: सील केलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याने संशय, प्रशासकीय सावळागोंधळ की मिलीभगत? 'अग्निसुरक्षे'चे नियम धाब्यावर

Goa Live News: लोकशाहीत प्रत्येक लोकप्रतिनिधीला समान अधिकार: दामू नाईक

वर्षाचा शेवटचा दिवस आयुष्याचाही शेवटचा ठरला; गोव्याच्या समुद्रात बिहारचा एक पर्यटक बुडाला, दुसरा जखमी

Horoscope: नव्या वर्षाची दमदार सुरुवात! 1 जानेवारीला 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; पैसा, नोकरी, करिअरमध्ये जबरदस्त यश

SCROLL FOR NEXT