Goa Politics Dainik Gomantak
गोवा

भाजप इतर पक्षांवर बिनबुडाचे आरोप करीत आहे; अविता बांदोडकर

भाजपने तृणमूल कॉंग्रेसला हिंदू विरोधी म्हटले होते. या विधानाचा तृणमूलचे नेते जयेश शेटगावकर आणि अविता बांदोडकर यांनी खरपूस समाचार घेतला.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर खोटेनाटे आरोप करून त्यांना हिंदू विरोधी म्हणणाऱ्या भाजपने (BJP) आधी स्वतःकडे पहावे. आसामातील हिंदूंच्या (Hindu) रक्षणासाठी त्यांनी काय केले ते स्पष्ट करावे, असे आवाहन तृणमूलच्या (TMC) नेत्या अविता बांदोडकर यांनी दिले. तृणमूल कॉंग्रेसला हिंदू विरोधी असे भाजपने म्हटले होते. या विधानाचा खरपूस समाचार तृणमूलचे नेते जयेश शेटगावकर (Jayesh Shetgaonkar) आणि अविता बांदोडकर (Avita Bandodkar) यांनी घेतला.

भाजपा स्वतःला हिंदू रक्षणकर्ते म्हणत असेल तर सडा वास्को येथील मंडपातील गणपती जो सध्या वास्को पोलिस ठाण्यात (Police Station) ठेवला आहे, तो पुन्हा त्या मंडपात स्थानापन्न करावा, अशी मागणी जयेश शेटगावकर यांनी केली. ते म्हणाले, भाजप तृणमूलला हिंदूविरोधी असे लेबल लावत आहे. कारण आमच्या मगोप सोबतच्या युतीमुळे ते अस्वस्थ झाले आहे.

तेव्हा कुठे गेले होते भाजपचे हिंदूप्रेम

राज्यात बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना ही समस्या दूर करण्याऐवजी भाजप इतर पक्षांवर बिनबुडाचे आरोप करीत आहे. आसाममध्ये एनआरसीमुळे भाजपने ११ लाख हिंदूंना वेठीस धरले होते. तेव्हा भाजपचे हिंदू प्रेम कुठे गेले होते? असा सवालही अविता बांदोडकर यांनी उपस्थित केला. तृणमूल कॉंग्रेस म्हणजे मंदिर (Temple), मस्जिद, चर्च (Church) यांना एकत्र करण्यासाठी उभा आहे. लोकांमध्ये फूट पाडणे ही तृणमूल कॉंग्रेसची भूमिका नसून, भाजपचेच तसे राजकारण खेळते, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT