Goa Politics BJP MGP alliance Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: फोंड्यात 'मगो'बाबत भाजप 'सावध'! युती कायम, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील- रितेश नाईक

Goa Politics BJP MGP alliance: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) कार्यालय सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर या घडामोडींवर भाजपचे फोंडा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार रितेश नाईक यांनी संयमित प्रतिक्रिया दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: फोंडा मतदारसंघात आपले संघटन अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) कार्यालय सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर या घडामोडींवर भाजपचे फोंडा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार रितेश नाईक यांनी संयमित प्रतिक्रिया दिली आहे. मगो आणि भाजप हे सध्या युतीतील घटक पक्ष असल्याचे सांगत त्यांनी या निर्णयाची पक्षाला पूर्ण कल्पना असल्याचे स्पष्ट केले. याविषयावर कोणतीही भूमिका किंवा पुढील निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

फोंडा परिसरातील राजकीय समीकरणे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलत असल्याची चर्चा सुरू असताना ‘मगो’ने फोंड्यात कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे युतीतील जागावाटप, संघटनात्मक विस्तार आणि स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकांबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, रितेश नाईक यांनी याविषयावर कोणतीही आक्रमक भूमिका न घेता पक्षनेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष

मडकई मतदारसंघात अलीकडेच रॉय नाईक यांच्या नावाचे व छायाचित्रांचे बॅनर्स झळकल्याने त्यांच्या संभाव्य निवडणूक तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता रॉय यांचे बंधू रितेश नाईक यांनी थेट भाष्य टाळले.

‘रॉय नाईक निवडणूक लढविण्याचा विचार करत असतील, तर त्याबाबतचा प्रश्न त्यांनाच विचारावा,’ असे ते म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे मडकईतील राजकीय हालचालींवर अधिक चर्चा रंगू लागली असून आगामी काळात फोंडा आणि मडकई मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT