Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आतिषी, चर्चिल भेटीमुळे सासष्‍टीत खळबळ, राजकीय घडामोडींना वेग; दोन्‍ही बाजूने सदिच्‍छा भेट असल्याचा दावा

Atishi Meets Churchill Alemao: आतिषी यांनी वार्का येथे चर्चिल आलेमाव यांची त्‍यांच्‍या निवासस्‍थानी भेट घेतल्‍याने सासष्‍टीतील राजकारणात खळबळ माजली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: बाणावलीचे आप आमदार व्हेंझी व्‍हिएगस हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सासष्‍टीत चालू असतानाच आम आदमी पक्षाच्‍या प्रभारी आतिषी यांनी दोन दिवसांपूर्वी वार्का येथे चर्चिल आलेमाव यांची त्‍यांच्‍या निवासस्‍थानी भेट घेतल्‍याने सासष्‍टीतील राजकारणात खळबळ माजली आहे. ही सदिच्‍छा भेट असल्‍याचे आम आदमी पार्टी आणि चर्चिल आलेमाव या दोघांकडूनही सांगितले जात असले तरी यामागेही काहीतरी राजकारण दडले आहे, असा तर्क सध्‍या वर्तवला जात आहे.

यासंदर्भात चर्चिल आलेमाव यांच्‍याशी संपर्क साधला असता, दाेन दिवसांपूर्वी आतिषी आणि आम आदमी पक्षाचे काही स्‍थानिक पदाधिकारी आपल्‍याला भेटायला आले होते, ही गोष्‍ट खरी असली तरी ती सदिच्‍छा भेट होती. मात्र आमची राजकारणावरही चर्चा झाली, असेही ते म्‍हणाले. चर्चिल आलेमाव यांनी या चर्चेसंदर्भात अधिक माहिती देण्‍यास नकार दिला. मात्र चर्चिल आलेमाव गोव्‍यात कुठलाही पक्ष वर काढू शकतो, हे अन्‍य पक्षांच्‍या नेत्‍यांना माहीत असल्‍यामुळेच ते माझ्‍या भेटी घेतात, असेही ते म्‍हणाले.

प्राप्त माहितीप्रमाणे, आतिषी आणि चर्चिल यांच्‍या भेटीत बाणावलीपेक्षा नावेली मतदारसंघाबाबतच अधिक चर्चा झाली असून चर्चिल कन्‍या वालंका आलेमाव यांना आम आदमी पक्षाकडून नावेलीची उमेदवारी देण्‍याची तयारी यावेळी दाखविण्‍यात आली होती. ‘आप’ने नुवे मतदारसंघावरही आपले लक्ष केंद्रीत केले असून नुवेचे माजी आमदार बाबाशान डिसा यांनाही आपचे पदाधिकारी यापूर्वी भेटले होते.

‘आरजी’शी युतीची ‘आप’ची तयारी: व्हेंझी

दरम्‍यान, ‘आप’चे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांनी आज एका ट्विटद्वारे आरजी पक्ष गोव्‍यात ‘आप’बरोबर युती करण्‍यास तयार असल्‍याचे म्‍हटले आहे. ‘आरजी’चे अध्‍यक्ष मनोज परब यांनी ‘आप’कडे युतीचा प्रस्‍ताव मांडला होता. आमची त्‍यांच्‍याशी व ‘आप’चे केंद्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्‍याशी चर्चा झाली. गोव्‍याच्‍या हितासाठी ‘आप’ अटीशिवाय ‘आरजी’शी युतीस तयार आहे, असे व्हेंजी म्‍हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT