Goa scandal | Aishwarya Korgaonkar Dainik Gomantak
गोवा

Goa Scandal: राजकीय फायद्यासाठी महिलांवर गलिच्छ आरोप; चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांचा चोडणकरांवर आरोप

पत्रकार परिषदेत अश्रू अनावर; सुरवात कुणी केली हे समोर आले पाहिजे

Akshay Nirmale

Goa Scandal: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील एक मंत्री आणि पंचायत सदस्य कथित सेक्स स्कँडलमध्ये गुंतल्याचा आरोप, कुणाचेही नाव न घेता, शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केला होता.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांनी थेट पत्रकार परिषद घेत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही काहीही पसरवणार का? असा सवाल त्यांनी गिरीष चोडणकरांना केला.

पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांच्यासमवेत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चोडणकर यांच्या आरोपानंतर राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाली, याबाबतच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. सोशल मीडियावर संबंधित मंत्री व त्या महिला पंच सदस्याचा फोटोही व्हायरल झाला. विरोधकांनी तर हा विषय उचलून धरला आहे.

हे प्रकरण दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, आज रविवारी दिवसभरात या प्रकरणातील अनेक घडामोडी समोर आल्या.

या प्रकरणातील संबंधित महिलेने गिरीष चोडणकर यांना खुले पत्र लिहीत तुमच्या घरातील महिलांबाबत तुम्ही असेच वागला असता का? असा सवाल केला होता. तुमच्या नात्यातील एखाद्या महिलेची अशी नाहक बदनामी केली असती तर तुम्हाला काय वाटले असते, असेही त्यांनी विचारले होते.

दरम्यान पत्रकार परिषदेत ऐश्वर्या कोरगावकर म्हणाल्या की, मला गिरीष चोडणकर यांनी उत्तर द्यावे की ते मला ओळखतात तरी का? एखाद्या महिलेवर ते अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप ते कसे करू शकतात? त्यांच्या घरातील महिलांबाबत ते असेच वागले असते का? तुमच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही काहीही पसरवणार का?

याप्रकरणी वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच सायबर सेलकडेही तक्रार दाखल केली आहे.

ऐश्वर्या कोरगावकर म्हणाल्या की, मी महिलांसाठी काम करते. आणि मला हे भोगावे लागत आहे. याची सुरवात कुणी केली, त्या पाठीमागचा हेतू काय होता, हे कळले पाहिजे. मला न्याय हवा आहे. माझ्याबाबत जे घडले आहे, तसे कुणाबाबतही घडू नये. मला न्याय हवा आहे.

मंत्री महिलांना पाठिंबा देत असतील तर तुम्ही असे वागणार का? आम्ही सर्वजणी मंत्र्यांना पाठिंबा देण्यासाठी जमलो आहोत.

सांकवाळच्या जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात म्हणाल्या, कोणत्याही पुराव्याशिवाय हे आरोप केले गेले आहेत. ती फेक न्यूज आहे. फोटोमॉर्फ करून केली गेलेली ती न्यूज आहे. राजकीय लाभासाठी हे प्रतिमाहनन केले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: फेक क्राईम ब्रँच ऑफिसर, 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी अन् 42 लाखांवर डल्ला; भामट्याचा गेम ओव्हर, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

SCROLL FOR NEXT