Drug testing machines Dainik Gomantak
गोवा

Drug Testing Machines: सावधान! ड्रग्ज तपासणी यंत्रे येणार पोलिसांच्या ताफ्यात

वागातोर येथे वापर; अंमलीपदार्थ सेवन केलेल्या ७ जणांवर कारवाई

दैनिक गोमन्तक

Drug Testing Machines : सरकारने गोवा ड्रग्जमुक्त करण्याचा नारा दिल्यानंतर पोलिसांनीही ठोस पावले उचलली आहेत. अंमलीपदार्थविरोधी कक्षासह गुन्हे शाखा, जिल्हा पोलिसांनी ड्रग्ज खरेदी-विक्री करणाऱ्यांसह त्याचे सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाई सुरू केली आहे.

ड्रग्ज घेतलेल्यांची चाचणी ‘सोटोक्सा’ या अत्याधुनिक मशीनद्वारे करून वागातोर येथे शनिवारी रात्री ७ पर्यटकांना ताब्यात घेण्यात आले.

सोटोक्सा मशीन यंत्र प्रायोगिक तत्वावर वापरण्यासाठी पोलिस खात्याला कंपनीने सध्या दिली आहे. शनिवारी रात्री वागातोर येथील काही रेस्टॉरंटमध्ये या मशीनचा वापर करत संशयास्पद व्यक्तींची तपासणी केली गेली.

यावेळी ७ जणांनी ड्रग्ज घेतल्याचे निष्पन्न झाले. ही प्रायोगिक तत्वावर तपासणी करण्यात येत असल्याने त्यांना हणजूण पोलिसांनी ताब्यात घेऊन गोमेकॉ इस्पितळात त्यांची रक्त तपासणी करण्यात आली आहे. हा अहवाल येण्यास काही वेळ लागतो.

मात्र, या अत्याधुनिक मशीनमुळे तपासणी झटपट व घटनेच्या ठिकाणी करणे शक्य होणार आहे. ही मशीन पोलिस खात्याच्या ताफ्यात आल्यावर ड्रग्ज सेवन करणाऱ्यांना वचक बसू शकतो. ड्रग्ज खरेदी-विक्रीसह त्याचे सेवन करणेही कायद्यानुसार गुन्हा आहे, असे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले.

असे आहे सोटेक्सा मशीन

१ खासगी कंपनीने उत्पादन केलेल्या ‘सोटोक्सा’ची किंमत १० लाख रुपयांच्या आसपास आहे. हे मशीन सध्या केवळ गुजरात व केरळ पोलिसांकडे आहे.

२ या मशीनच्या मदतीने एकावेळी ६ प्रकारच्या ड्रग्जची माहिती मिळते. मशीनला जोडण्यासाठी प्रिंटर आहे. तसेच चाचणीसाठी कॅट्रीजीस आहेत.

३ सरकारने मशीन खरेदीला हिरवा कंदील दाखवला आहे. हे मशीन लवकर खरेदी करण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत.

परप्रांतीय ताब्यात

ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये धवल कुमार ओधवजीभाई सोजित्रा (२८, सुरत-गुजरात), निधन एन. एस. एस. सुजेन्द्रन एन. टी. (३२, केरळ), दिलशाद नजीब एम. पी. महम्मद कोया (२७, केरळ), अजीन जोय (२०, केरळ), संदेश एस. नाईक (२८, कारवार), एम. विजय शंकर महादेवा गावडा एमबी (२४, कर्नाटक), कोलादिया निशांत भारत भाई (२६, सुरत-गुजरात) या ७ जणांचा समावेश आहे. या सर्वांची ‘सोटोक्सो’ मशीनच्या मदतीने केलेली चाचणी सकारात्मक आली होती.

ड्रग्ज विक्रेते शोधतात कायद्यातील पळवाटा

राज्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत आहे. गेल्यावर्षी आणि यंदाही अधिक तर प्रकरणे गांजाची नोंद झाली आहेत. २० किलोपेक्षा कमी गांजा असल्यास विक्रेत्याला न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळतो. त्यामुळे हे विक्रेते अधिक प्रमाणात गांजाची विक्री करत नाहीत. त्यांना माहिती असते की पकडलो गेलो तरी जामिनावर सहज सुटका होते.

कायद्यानुसार २० किलोपेक्षा अधिक गांजा सापडल्यास तो कमर्शियलमध्ये मोडतो. त्यामध्ये जामीन मिळण्याची शक्यता कमी आणि किमान १० वर्षाची शिक्षा आहे. गोवा पर्यटन स्थळ असल्याने काही पर्यटक सिंथेटीक महागडे ड्रग्ज घेण्यापेक्षा स्वस्त व थोडीशी नशा येणारेच गांजासारखे ड्रग्ज खरेदी करणे पसंत करतात.

सेवनाचे वाढते प्रमाण

राज्यात गतवर्षी दीडशेहून अधिक ड्रग्जप्रकरणी गुन्हे नोंदवून १७५ विक्रेत्यांना अटक झाली होती.

ड्रग्ज दलाल व विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असली तरी त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

किनारपट्टी नशेबाज आढळून येतात. मात्र, जागेवरच तपासणी करण्याचे मशीन नसल्याने अडचणी येत होत्या.

या यंत्राच्या खरेदीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सरकारने त्याला सकारात्मक तोंडी उत्तर दिले आहे. ही यंत्रे पोलिस खात्यासाठी उपलब्ध झाल्यावर किनारपट्टी परिसरात रेस्टॉरंटमध्ये ड्रग्ज नशेत असलेल्यांची तिथल्या तिथे तपासणी करणे शक्य होईल.

- निधीन वाल्सन, पोलिस अधीक्षक, उत्तर गोवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT