Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! वेश्या रॅकेट प्रकरणी तीन टॅक्सी चालकांना घेतले ताब्यात; चौकशी सुरु

Goa Police: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन चार जणांच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले होते.

Manish Jadhav

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन चार जणांच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले होते. यातच आता, या प्रकरणात गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन टॅक्सी चालकांना समन्स बजावून ताब्यात घेतले. हे तीन्ही टॅक्सी चालक उत्तर गोव्यातील आहेत.

इमाम सुतार, उमेश बागली आणि झीशान अली शेख अशी समन्स बजावण्यात आलेल्या टॅक्सीचालकांची नावे आहेत. बेकायदेशीर कृत्यांमधील त्यांच्या सहभागाविषयी गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. गोव्यात चालणाऱ्या वेश्याव्यवसायातील आरोपींशी या तिघांचा संबंध असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी 4 आरोपींना अटक केली

दरम्यान, एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या चार आरोपींना (Accused) यापूर्वी पोलिसांनी अटक केलीय. 1) सय्यद उस्मान, 54, चित्तूर, आंध्र प्रदेश, 2) मोहम्मद मोहब्बुल्ला, वय 30, गुडगाव, 3) योगेश कुमार, वय 42 वर्षे मूळ गाझियाबाद. उत्तर प्रदेश, 4) सुभाष प्रधान, मूळ ओडिशा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 67 आणि 67-A अंतर्गत या चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

योगेशने वेबसाईट तयार केली होती

मिळालेल्या माहितीनुसार, योगेशच या रॅकेटचा मास्टरमांइड होता. त्यानेच deepikaverma.com नावाची वेबसाईट बनवली होती. घटनास्थळावरुन पोलिसांनी योगेशकडील सीपीयू जप्त केला होता.

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सुमारे 78 अश्‍लिल एस्कॉर्ट सर्व्हिस संकेतस्थळे ब्लॉक करण्यात आल्याची माहिती यापूर्वी क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली होती. हे संशयित एस्कॉर्ट सर्व्हिस संकेतस्थळावर महिलांची (Women) अश्‍लिल छायाचित्रे प्रसिद्ध करुन गोव्यात एस्कॉर्ट सेवेची माहिती देत असत. त्यानंतर ते ग्राहक आणि दलाल यांच्या संपर्क साधायचे. दरम्यान, डीवायएसपी राजेश कुमार आणि एसपी क्राईम राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली पीआय दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT