Goa police  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: खासगी कारवर लावले गोवा पोलिसांचे स्टीकर; पाठलाग करून ताब्यात घेतली कार

काणकोणमधील स्थानिकांनी केली तक्रार; गुन्हा दाखल

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police Sticker on Private Car: खासगी कारवर गोवा पोलिसांचे स्टिकर लावून प्रवास केल्याची घटना उजेडात आली आहे. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. दरम्यान, काणकोणमधील स्थानिकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती.

जीए 10 ए 2330 या क्रमांकाची ही कार आहे. रात्रीच्यावेळी काणकोण भागात ही कार फिरवली जात होती. याबाबत स्थानिकांकडून पोलिसांना तक्रार मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून ही गाडी पकडली. या कारमध्ये एक पुरूष आणि तीन महिला होत्या.

पैकी एका महिलेने दोन स्टार असलेल्या पोलिसांचा गणवेश परिधान केला होता. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. तेव्हा कायदा हातात घेण्याचा आमचा काहीही हेतू नव्हता. आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली या कारमधील प्रवाशांनी दिली आहे. काणकोण पोलिसांनी ही कारवाई केली.

दरम्यान, या कारच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. त्यावेळी मिल्तिया शिर्के यांच्या नावावर ही कार नोंद असल्याचे समोर आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, यासाठी गोवा पोलिसांची परवानगी घेण्यात आली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' भाजपचेच प्यादे? चोडणकरांचा उपरोधिक टोला; 'आप'-भाजपमध्ये पंजाब-गोवा 'एक्सचेंज ऑफर' असल्याचा दावा

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

SCROLL FOR NEXT