Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: पोलिसांची राज्यभर नाकाबंदी मोहीम, 2972 वाहनांची तपासणी; 35 जण प्रतिबंधात्मक अटकेत

Goa Police Inspection: पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार, पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी राज्यभर नाकाबंदी मोहीम राबविली. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक तपासणी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार, पोलिसांनी ११ ऑक्टोबर रोजी राज्यभर नाकाबंदी मोहीम राबविली. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक तपासणी केली. या मोहिमेदरम्यान राज्यभरात ३,९७९ नागरिकांसह २,९७२ वाहनांची तपासणी केल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

तपासणीदरम्यान पोलिसांनी ३५ जणांना प्रतिबंधात्मक अटक केली. त्याचप्रमाणे, ‘कोटपा’अंतर्गत (सिगारेट ॲण्ड अदर्स टोबॅको प्रॉडक्ट ऍक्ट) ८६ आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व थुंकणे नियम उल्लंघनांबाबत ८८ कारवाया केल्या.

जिल्हानिहाय तपशीलानुसार, उत्तर गोव्यात व्यक्ती व वाहन तपासणीचे प्रमाण जास्त होते, तर दक्षिण गोव्यात धूम्रपान आणि थुंकणे यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. सार्वजनिक सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी अशा राज्यव्यापी नाकाबंदी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येतील, असे गोवा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दक्षिणेत आरोग्य नियमोल्लंघनावर बडगा

दक्षिण गोव्यातील १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविली. एकूण १,४१९ नागरिक आणि ९८० वाहनांची तपासणी केली. तसेच १२ जणांना प्रतिबंधात्मक अटक केली.

या सर्व कारवाया कोलवा व मुरगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झाल्या. ‘कोटपा’अंतर्गत ३९ आणि धूम्रपान व थुंकणे प्रतिबंध नियमांअंतर्गत ५६ जणांवर कारवाई केली. दक्षिण गोव्यात सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित उल्लंघनांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होते.

उत्तरेत ग्रामीण भागात वचक

उत्तर गोव्यात १४ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम पार पडली. या भागात २,५६० नागरिक आणि १,९९२ वाहने तपासली. २३ जणांना प्रतिबंधात्मक अटक केली. ‘कोप्टा’अंतर्गत ४७, तर धूम्रपान व थुंकणे प्रतिबंध उल्लंघनांबाबत ३२ जणांवर कारवाई केली. जुने गोवे, हणजूण, कळंगुट आणि साळगाव पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 'महादेवाचा दिव्य आशीर्वाद 'या' 3 राशींच्या डोक्यावर: सोमवारी दूर होतील जीवनातील सर्व समस्या; वाचा दैनिक राशिभविष्य

Babasaheb Ambedkar Statue: चोपडे सर्कलजवळ उभारणार डॉ. आंबेडकरांचा भव्‍य पुतळा! आमदार आरोलकर यांची घोषणा

Serendipity Festival: नृत्य, नाट्य आणि संगीत आणि दृश्यकलांचा उत्सव! वेध सेरेंडीपिटीचे..

Vaibhav Suryavanshi Vice Captain: युवा तारा चमकला! 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची उपकर्णधारपदी नियुक्ती, 'या' संघाचं करणार नेतृत्व

Borim Bridge: बोरी पूल दुरुस्ती सुरू! राशोल-शिरोडा फेरीवर वाढला ताण; वाहतूक कोंडीची समस्या

SCROLL FOR NEXT