Sonali Phogat  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : सोनाली मृत्यू प्रकरणी पासपोर्टसह भक्कम पुरावे पोलिसांच्या ताब्यात

गोवा पोलिस आणि हिसार पोलिसांच्या तपासावर समाधानी नसल्याने, सीबीआयमार्फत चौकशी व्हावी यासाठी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती सोनालींच्या नातेवाईकांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणातील पुरावे गोळा करण्यासाठी हरियाणा राज्यातील हिसारमध्ये गेलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने सांगवान याच्या सोनिपत येथील घराची झडती घेऊन नातेवाईकांची जबानी नोंद करून घेतली. तर सोनाली यांच्या मृत्यू प्रकरणी आमच्याकडे भक्कम पुरावे असून या आधारे संशयितांना नक्कीच शिक्षा होईल, असा विश्‍वास पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी व्यक्त केला.

सोनाली मृत्यू प्रकरणातील निरनिराळे खुलासे रोजच येत असून मुख्य संशयित याच्याविरोधात भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सांगवान यानेच कट रचून सोनालीची हत्या केल्याचे त्याने कबूल केले असले, तरी न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासाठी गोवा पोलिस प्रयत्नशील आहेत. पाच सदस्यीय पोलिस पथकाने हिस्सार येथील सोनाली यांचे घर आणि फार्महाऊसची माहिती मिळवल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आता सांगवान याच्या घराकडे वळवला आहे. रविवारी त्यांनी सकाळी सोनिपत येथील घरी जाऊन विविध प्रकारचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न केला, तर दुपारी गुरुग्राम येथील त्याच्या फ्लॅटमध्ये जाऊन माहिती मिळवली.

दुसरीकडे सुधीरचे आणि आपले सध्या जमत नसून त्याच्यामुळे आपण नैराश्‍यात असल्याची माहिती सोनाली यांनी सीतापूरचे निर्माते महंमद अक्रम यांना दिली होती, अशी माहिती मिळाली आहे.

काही दिवसांपासून नैराश्‍यात

सीतापूर येथील चित्रपट निर्माते महंमद अक्रम यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुधीर हा सोनाली यांना विविध मार्गाने त्रास देत होता. त्यामुळेच त्या नैराश्‍यात होत्या. ‘पूर्वी आपले सुधीरबरोबर ठीक होते. आता सुधीरचे केवळ आपल्या पैशाकडे लक्ष आहे.’ असे आपल्याला सोनालींनी सांगितल्याची माहिती अक्रम यांनी दिली.

सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात जाणार

गोवा पोलिस आणि हिसार पोलिसांच्या तपासावर समाधानी नसल्याने, सीबीआयमार्फत चौकशी व्हावी यासाठी हायकोर्टात जाणार असल्याची माहिती सोनालींच्या नातेवाईकांनी दिली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र लिहिले आहे. सोनाली यांचे प्रेरणा आणि जाट उदय संस्थान नावाचे दोन ट्रस्ट असून ते एप्रिल 2021 मध्ये नोंदणीकृत आहेत. त्यात संशयित सुधीर पदाधिकारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT