youtuber uvais sutar news Dainik Gomantak
गोवा

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Goa Police Seize Modified BMW : वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करणे हा मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे थेट उल्लंघन असून हाच धडा गोवा पोलिसांनी नुकताच एका प्रसिद्ध युट्यूबरला शिकवला

Akshata Chhatre

Uvais Sutar BMW Seized : सोशल मीडियावर गाड्यांचे मॉडिफिकेशन आणि स्टंट व्हिडिओज शेअर करून लाखो फॉलोअर्स मिळवणाऱ्या एका इन्फ्लुएंसरसाठी गोवा पोलीस आता मोठी धोक्याची घंटा ठरतायत. वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करणे हा मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे थेट उल्लंघन असून हाच धडा गोवा पोलिसांनी नुकताच एका प्रसिद्ध युट्यूबरला शिकवला. गोव्यातील एका नाकाबंदीमध्ये, उवैस सुतार नावाच्या युट्यूबरची मॉडिफाइड BMW 5-Series लक्झरी सेडान जप्त करण्यात आली.

BMW जप्त; 'लाऊड एक्झॉस्ट' आणि 'टिंटेड ग्लास' भोवले

मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवोली येथे अचानक तपासणी सुरू असताना ही घटना घडली. इन्फ्लुएंसरच्या जांभळ्या रंगाच्या BMW 5-Series सेडानमध्ये आफ्टरमार्केट M5 बॉडी किट लावण्यात आले होते.

तसेच, ती गाडी मोठ्या आवाजाच्या आफ्टरमार्केट एक्झॉस्ट आणि पूर्णपणे काळ्या केलेल्या खिडक्यांच्या टिंट्स सह आढळली. पीएसआय गोळतेकर आणि त्यांच्या टीमने या वाहनाची तपासणी केली. पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीचा नोंदणी क्रमांक नोंदवून घेत बेकायदेशीर मॉडिफिकेशन आढळल्याने गाडी जप्त केलीये.

केवळ मॉडिफिकेशनच नाही, हायस्पीड धोकादायक ड्रायव्हिंगही!

या इन्फ्लुएंसरच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तपासणी केली असता, त्याने रस्त्यावर जीवघेणी स्टंटबाजी केल्याचेही समोर आले आहे. एका शॉर्ट क्लिपमध्ये, इन्फ्लुएंसर Hyundai Verna ही गाडी १८० किमी प्रतितास वेगाने चालवत होता.

यादरम्यान, मध्य लेनमध्ये ट्रक आल्यावर, वेगाला ब्रेक लावण्याऐवजी त्याने १५० किमी प्रतितास वेगाने डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा धोकादायक प्रयत्न केला. नशिबाने हा ओव्हरटेक यशस्वी झाला, अन्यथा एक भीषण अपघात होण्याची शक्यता होती.

काय सांगतो कायदा?

भारतात, रोड ट्रान्सपोर्ट विभागाजवळ अधिकृत नसलेले कोणतेही मॉडिफिकेशन करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यात बाह्य रंग बदलणे (रॅप्स), काळ्या फिल्म्स लावणे, आफ्टरमार्केट एक्झॉस्ट सिस्टीम, अलॉय व्हील्स आणि हेडलाइट्स बदलणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश होतो.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ नुसार असे बदल आढळल्यास दंड आकारला जातो, वाहन जप्त केले जाते आणि काही प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते. मॉडिफाइड वाहनांचे व्हिडिओ बनवणाऱ्या आणि रस्त्यावर अशा धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्या इन्फ्लुएंसर्सना गोवा पोलिसांनी दिलेला हा संदेश स्पष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सीमेवर गोव्याची गर्जना! वास्कोची स्नेहा यादव 'BSF'मध्ये दाखल; भारत-बांगलादेश सीमेवर देशसेवा

Goa Third District: 2 जिल्हे करूनही गेल्या 38 वर्षांत 'गोव्यात' जे झाले नाही ते आता होणार का?

Elections In Goa: वर्षाच्या सुरुवातीला फोंड्याची पोटनिवडणूक, 2027 मध्ये विधानसभा निवडणुका; राजकीय घडामोडींसाठी क्रियाशील वर्ष

Tillari Dam: 'तिळारी'च्या कमांड क्षेत्रातून मोठा भूभाग वगळण्याचा प्रस्ताव गोव्यासाठी घातक, कॅसिनोसाठी धोकादायक पायंडा नको

Goa Live News: वास्कोची स्नेहा यादव बीएसएफमध्ये भरती; भारत-बांगलादेश सीमेवर देशसेवा

SCROLL FOR NEXT