Goa tourist incident Dainik Gomantak
गोवा

Viral Post: "मुलगी दिसली, बोलायला जाताच पोलिसांनी लुटलं" रात्रीच्या अंधारात तीन मित्रांसोबत गोव्यात घडला धक्कादायक प्रकार

Goa tourist scams: एका भारतीय पर्यटकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनुभवामुळे गोव्याच्या पर्यटनावरच त्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलेय

Akshata Chhatre

Goa police scam tourist Viral Post: पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्याच्या प्रतिमेला एका धक्कादायक घटनेने तडा गेलाय. एका भारतीय पर्यटकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनुभवामुळे गोव्याच्या पर्यटनावरच त्याने प्रश्नचिन्ह निर्माण केलेय. रात्रीच्या वेळी गोव्याच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी थांबवून त्यांच्याकडून १० हजार रुपये उकळल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय आणि यावरूनच ही घटना नेमकी गोवा पोलिसच करतात की पोलिसांच्या नावाने इतर कुणीतरी हा 'खेळ' करतंय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

रात्रीच्या रस्त्यांवरील थरार

एका व्यक्तीने 'रेडिट'वर शेअर केलेल्या माहितीनुसार, तो आपल्या तीन मित्रांसोबत गोवा फिरायला गेला होता. एका रात्री दारूच्या नशेत तो झोपी गेला तर त्याच्या तीन मित्रांनी स्कूटर घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर त्यांना एक मुलगी दिसली आणि ते तिच्याशी बोलण्यासाठी थांबले. त्याचवेळी, पोलिसांच्या दोन गाड्या तिथे आल्या आणि त्यांनी या तरुणांना घेरले. पोलिसांनी तात्काळ त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

पोलिस स्टेशनमध्ये धमकावल्याचा आरोप

मित्रांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी त्यांना थेट पोलिस स्टेशनच्या पार्किंगमध्ये नेले. "पैसे दिले नाहीत तर आम्ही तुमच्या घरच्यांना गोव्यात तुम्ही काय करत होता ते सांगू आणि तुमची वैद्यकीय तपासणी करू," अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे या तरुणांनी सांगितले.

दुसऱ्याच दिवशी त्यांची दिल्लीला परतण्याची फ्लाईट असल्याने ते खूप घाबरले. त्यांनी पोलिसांची वारंवार विनवणी केली, पण पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. शेवटी भीतीपोटी या तरुणांनी १० हजार रुपये पोलिसांना दिले आणि आपली सुटका करून घेतली.

‘गोव्यातील पर्यटन सुरक्षित आहे का?’

या घटनेनंतर, मूळ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने रेडिटवर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. "गोवा पोलिसांचाच हा प्रकार आहे की कुणीतरी पोलिसांच्या नावाने हे करत आहे?" हा प्रश्न त्याने उपस्थित केला. तसेच, गोवा भारताचाच भाग असूनही भारतीय नागरिकांना अशी वागणूक का दिली जाते, असा संतप्त सवालही त्याने विचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

SCROLL FOR NEXT