Goa police  canava
गोवा

Goa Police: अपहरण झालेल्या मुलीला केवळ सहा तासांत सोडवले; गोवा पोलिसांची यशस्वी कामगिरी

Goa Crime News: डिचोलीतील १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती

Akshata Chhatre

डिचोली: गोवा पोलिसांनी कुशलता दाखवत डिचोलीतील अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करत तिला पालकांचा हवाली केले. डिचोलीतील १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती आणि यानंतर केवळ ६ तासांमध्ये पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका केली होती.

डिचोलीतील मोहम्मद शब्बीर बल्लारी नावाच्या एका स्थानिकाने त्याच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवली. यानंतर पोलिसांनी ताबडतोब तपास सुरु केला. बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी मुलीचा शोध सुरु झाला.

तपास करताना पोलिसांना मुलगी हुब्बळी येथे असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमरनाथ पाळणी, विकेश हडफडकर, कॉन्स्टेबल विशाल आणि विजया असे एक पथक तयार करण्यात आले.

हुब्बळी येथील बस स्टॅन्डवर केवळ सहा तासांमध्ये पोलिसांनी मुलीला शोधून काढले. पोलिसांनी मुलीला सुखरूप गोव्याला परत आणले आहे. या प्रकरणात सध्या बीएनएसच्या कलम १३७ (२) आणि गोवा बाल कायद्याच्या कलम ८ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे आणि पुढील तपास उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली दिनेश गडेकर व गट करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT