Goa Police Reply to Twitter User  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'ते' रशियन जुगाड कसे करायचे? मित्रासाठी विचारला प्रश्न, गोवा पोलिस म्हणाले 'मित्राला सांग...'

गोव्यात वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो असा एक प्रचलित गैरसमज असून, याबाबतच एकाने प्रश्न विचारला अन् त्याला थेट गोवा पोलिसांनी खाकीच्या शब्दात उत्तर दिले.

Pramod Yadav

Goa Police Reply to Twitter User: गोव्यात दरवर्षी लाखो देशी - विदेशी पर्यटक फिरण्यासाठी, निसर्गाच्या सानिध्यात मौजमजा करण्यासाठी येत असतात. त्यात अनेक पर्यटक गोव्याबाबत विविध गैरसमज मनात घेऊन येतात. विशेषत: मद्य, अमली पदार्थ आणि वेश्याव्यवसाय याबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असतात. तसेच, गोव्यात वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो असा एक प्रचलित गैरसमज असून, याबाबतच एकाने प्रश्न विचारला अन् त्याला थेट गोवा पोलिसांनी खाकीच्या शब्दात उत्तर दिले.

झाले असे की, महाराष्ट्रातील एका ट्विटर युझरने गोव्यात आल्यानंतर 'ते' रशियन जुगाड कसे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला. शिवाय हा प्रश्न तो मित्रासाठी विचारत असल्याचे त्याने सांगितले. या प्रश्नावर सहाजिकच लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला. पण, उत्तर गोव्याचे पोलिस अधिक्षक निधीन वाल्सन यांनी या प्रश्नाला दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

निधीन वाल्सन यांनी पोलिस एकाला तुरूंगात डांबतानाचा फोटो शेअर करत, "मित्राला सांग जुगाड करता - करता त्याचे जुगाड होईल." असे पोलिसांच्या शैलीत त्यांनी उत्तर दिले आहे. त्यावर ज्याने प्रश्न विचारला त्याने देखील सांगतो सर असे म्हणून प्रतिक्रिया दिली आहे.

Goa Police Reply to Twitter User

"भारतीय कायद्यानुसार, गोव्यात वेश्याव्यवसायास सक्त मनाई आहे. सर्वांचा आदर, सुरक्षितता आणि प्रतिष्ठा याला प्राधान्य देऊ या. गोवा येथील नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध संस्कृत, लँडस्केप्स आणि वैविध्यपूर्ण अनुभव पाहण्यासाठी पर्यटकांचे स्वागत करते. चला गोव्याचे खरेपण जपून, तिथल्या परंपरा स्वीकारून कायदेशीर बाबी आणि सामाजिक समरसतेची तत्त्वे जपूया." गोव्याचा आदर करा! असा हॅशटॅग वाल्सन यांनी वापरला आहे.

निधीन वाल्सन यांनी शेअर केलेल्या वरील आवाहनाला प्रश्न विचारलेल्या तरूणाने हात जोडत कायदा मान्य केल्याची कबुलीच दिली आहे.

दरम्यान, गोव्यात पर्यटनासाठी येणारे काहीजण अशा गैरसमजाला बळी पडतात व त्यातून विविध प्रकार घडल्याचे यापूर्वी समोर आले आहे. त्यामुळे राज्यात फसव्या, कायदाबाह्य गोष्टी करू नयेत याबाबत सरकारतर्फे वारंवार सतर्क केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT