Goa Police Recruitment 2021  Dainik Gomantak
गोवा

Goa Police Recruitment 2021: 22 सप्टेंबरपासून सुरू होणार 296 जागांसाठी पदभरती

पुरुषांसाठी ही शारीरिक चाचणी चार ठिकाणी, तर महिलांची चाचणी आल्तिनो - पणजी येथील गोवा राखीव पोलिस दल कार्यालयात घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा पोलिस खात्यामध्ये (Goa Police Recruitment 2021) तीन वर्षांसाठी हंगामी तत्वावर 296 जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठी पुरुष व महिला उमेदवारांकडून सुमारे 10 हजार 304 अर्ज दाखल झाले आहेत. ही भरती 22 सप्टेंबरपासून सकाळी 9 वा. सुरू होणार आहे. पुरुषांसाठी ही शारीरिक चाचणी चार ठिकाणी, तर महिलांची चाचणी आल्तिनो - पणजी येथील गोवा राखीव पोलिस दल कार्यालयात घेण्यात येणार आहे.

गृहरक्षक पदासाठी अर्ज केलेल्यांना शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याची ‘कॉल लेटर्स’ पाठवण्यात आली आहेत. ज्यांना ती मिळाली नसतील, त्यांनी उमेदवारी अर्जाच्या क्रमवारीनुसार येताना पासपोर्ट आकाराचे छायाचित्र घेऊन उपस्थित राहावे.

अर्जाच्या क्रमवारीनुसार चाचणी

1) तिसवाडी, बार्देश व पेडणे तालुक्यात राहणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी पर्वरी येथील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर चाचणी होणार आहे. 22 सप्टेंबरला अर्ज क्रमांक 6 ते 4481, 23सप्टेंबरला अर्ज क्रमांक 4479 ते 10,298 तर डिचोली व सत्तरी तालुक्यातील पुरुष उमेदवारांसाठी वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण स्कूल केंद्राच्या मैदानावर चाचणी होणार आहे.

2) 22 सप्टेंबरला अर्ज क्रमांक 2 ते 3170, 23 सप्टेंबरला अर्ज क्रमांक 3172 ते 6703 आणि 24 सप्टेंबरला अर्ज क्रमांक 6726 ते 10294, धारबांदोडा व फोंडा तालुक्यातील पुरुष उमेदवारांसाठी फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय मैदानावर चाचणी होणार आहे.

3) अर्ज क्रमांक 35 ते 10,300, सांगे, केपे, काणकोण, सासष्‍टी व मुरगाव तालुक्यातील उमेदवारांसाठी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियएमवर चाचणी होईल. 22 सप्टेंबरला अर्ज क्रमांक 17 ते 3252, 23 सप्टेंबरला अर्ज क्रमांक 3260 ते 6740, 24 सप्टेंबरला अर्ज क्रमांक 6761ते 10,304 यांची चाचणी होईल.

4) महिला उमेदवारांसाठी 22 रोजी अर्ज क्रमांक 1 ते 2966, 23 रोजी 2974 ते 6616 व 24 रोजी अर्ज क्रमांक 6619 ते 10,303 यांची चाचणी होणार आहे.

कॉन्स्टेबल पदासाठी 20 रोजी चाचणी

पोलिस खात्यातील कॉन्स्टेबल पदासाठीच्या शारीरिक चाचणीसाठी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही, त्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. जे कोणी चाचणीसाठी आले नाहीत, त्यांनी २० सप्टेंबरला आल्तिनो - पणजी येथील गोवा पोलिस राखीव दलाच्या डेप्‍युटी कमांडंट होमगार्ड कार्यालयात उपस्थित राहावे. ज्यांना वैद्यकीय, परीक्षा किंवा इतर निकडीच्या प्रसंगामुळे येता आले नाही त्यांनी लेखी विनंती अर्ज येताना घेऊन यावे, असे आवाहन पोलिस खात्यातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT