Calangute Goa Dainik Gomantak
गोवा

पोलिसांचा छापा पडताच तिसऱ्या मजल्यावरुन ठोकली उडी; जुगार प्रकरणी 24 जणांवर कारवाई, 5.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

Calangute: संशयितांकडे 2,40,540 रोकड आणि तीन लाख रुपये किमतीचे जुगाराच्या संबधित साहित्य आढळून आले.

Pramod Yadav

कळंगुट: अवैध पद्धतीने सुरु असलेल्या जुगार अड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. नाईकवाडा, कळंगुट येथे केलेल्या या कारवाईत २४ जणांना ताब्यात घेण्यात आले. तर, पाच लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईवेळी एक संशयिताने पोलिसांच्या भीतीने चक्क तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकवाडा, कळंगुट येथील वेनोर प्लाझामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (दि. ११ ऑगस्ट) छापा टाकला. इमारतीत अवैध पद्धतीने जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकत तब्बल २४ जणांना ताब्यात घेतले.

संशयितांकडे 2,40,540 रोकड आणि तीन लाख रुपये किमतीचे जुगाराच्या संबधित साहित्य आढळून आले. पोलिसांनी एकूण पाच लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी २४ संशयितांना ताब्यात घेतले दरम्यान, जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक किशोर रामनान करत आहेत.

एकाने तिसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी

पोलिसांचा छापा पडताच घाबरलेल्या एका संशयिताने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. यात संशयित गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी सध्या सर्व संशयितांची जामीनावर सुटका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT