Goa Police Reshuffle Dainik Gomantak
गोवा

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Goa Police Reshuffle 2026: गोवा पोलिस आस्थापना मंडळाने सार्वजनिक हिताचा विचार करून पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा पोलिस आस्थापना मंडळाने सार्वजनिक हिताचा विचार करून पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षकांच्याही तात्काळ बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या बदलीला देखील मंजुरी दिली आहे.

पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांची काणकोण पोलिस ठाण्यातून तळपण कोस्टल सुरक्षा पोलिस ठाण्यात, निरीक्षक थेरॉन डिकॉस्टा यांची तळपण कोस्टल सुरक्षा पोलिस ठाण्यातून काणकोण पोलिस ठाणे, निरीक्षक अनंत गावकर यांची आगशी पोलिस ठाण्यातून म्हापसा पोलिस ठाणे, निरीक्षक दत्ताराम राऊत यांची टीसी मोपा विमानतळावरून आगशी पोलिस ठाणे, निरीक्षक परेश नाईक यांची गुन्हे शाखेतून (रायबंदर) टीसी मोपा विमानतळ, निरीक्षक नवीन देसाई यांची म्हापसा पोलिस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखा पोलिस ठाणे, निरीक्षक मेलिटो फर्नांडिस यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/व्हिजिलन्स येथून कुळे पोलिस ठाणे, निरीक्षक तुळशीदास नाईक यांची टीसी पर्वरी येथून कोलवा पोलिस ठाणे, निरीक्षक राघोबा कामत यांची कुळे पोलिस ठाण्यातून टीसी पर्वरी, निरीक्षक विदेश शिरोडकर यांची कोलवा पोलिस ठाण्यातून सुरक्षा विभाग पणजी, निरीक्षक सतीश पडवळकर यांची जीआरपी येथून जुने गोवे पोलिस ठाणे आणि निरीक्षक गौरेश मळीक यांची जुने गोवे पोलिस ठाण्यातून टीसी पेडणे येथे बदली केली आहे.

फ्रान्सिस कॉर्त यांची ‘ईओसी’च्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तसेच त्यांच्याकडे ‘ईओसी’च्या उपअधीक्षक पदाचाही ताबा असणार आहे. ब्रास मिनेझिस यांच्याकडे एफआरआरओ पोलिस अधीक्षक पदाचा ताबा देण्यात आला असून उपअधीक्षकपदाचा ताबा देखील त्यांच्याकडेच असणार आहे. पर्वरी उपअधीक्षक पदावर असलेले पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्याकडे आता पणजीचे पोलिस उपअधीक्षकपदाचा ताबा देण्यात आला आहे तर केपेचे उपअधीक्षक पद सांभाळणारे अधीक्षक आशिष शिरोडकर यांच्याकडे आता पेडणे आणि म्हापसाचे उपअधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.

द. गोवा पोलिस अधीक्षकपदी अक्षत आयुष

राज्यपाल एडीसी म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अक्षत आयुष यांची दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकपदी बदली केली आहे. ते १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रापासून पदाचा कार्यभार स्वीकारतील. अधीक्षक गुरुदास गावडे यांच्याकडे राज्यपालांचे एडीसी म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

उपअधीक्षक श्रीदेवी यांच्याकडे पिंक फोर्स

डिचोली पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. (आयपीएस) यांची एएचटीयू उपअधीक्षकपदी बदली केली असून त्यांच्याकडे पिंक फोर्स व महिला पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे. गौरव यादव (आयपीएस) यांची डिचोली उपअधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पणजीचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांची पर्वरी उपअधीक्षकपदी बदली केली आहे. काणकोणचे उपअधीक्षक नीलेश राणे यांच्याकडे केपे उपअधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT