CCTV at Goa Police station Danik Gomantak
गोवा

Goa Police: 'सावधान! पोलिस स्थानकातील कामकाजावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर'

गोव्याच्या 44 पोलीस स्थानकात एकूण 524 सीसीटीव्ही कॅमेरे (Goa Police)

Dainik Gomantak

Goa Police: वास्कोतील पोलीस स्थानकावर (Vasco Police station) आता तिसऱ्या डोळ्याची नजर (CCTV Camera). संपूर्ण पोलिस स्थानकात प्रवेश विभागात आता सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याने पोलिसांवर करडी नजर असणार आहे. वास्कोतील नीज गोंयकाराचे सरचिटणीस (General Secretary of Neej Goemkar) प्रशांत वस्त यांनी 12 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य सरकारचे मुख्य सचिव (Chief Secretary to the Government) यांना गोव्यातील प्रत्येक पोलिस स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली होती. (CCTV at all Police Stations in Goa)

राज्यातील एकूण 44 पोलीस स्थानकावर पोलीस खात्याच्या स्थानकातील कामकाजावर लोक अनेकदा आरोप करतात. रात्रपाळीत किती कर्मचारी ईमानेइतबारीने कर्तव्य बजावतात. तक्रार देण्यास येणाऱ्या लोकांची तक्रार का घेतली जात नाही, अशा अनेक घटना घडतात. पोलीसांवर अशाप्रकारचे अनेक आरोप झाले आहेत. दरम्यान वास्कोतील नीज गोंयकार क्रांती मोर्चाचे सरचिटणीस चंद्रशेखर वस्त यांनी गोव्यातील बहुतांश पोलीस स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत ज्यात ते मानवाधिकारी नियमाचे उल्लंघन करत आहे आणि ज्यामुळे सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही. त्यांच्या तक्रारी गंभीरपणे घेतल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये पी. एल. कार्यालय, कर्तव्य अधिकारी, डी एस पी कार्यालय, एस पी कार्यालय आणि व पोलिस स्टेशनमधील इतर कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी आवश्यक आदेश जारी करण्याची विनंती राज्याच्या मुख्य सचिवांना 12 ऑक्टोबर 2020 रोजी पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार राज्याच्या माहिती तंत्रज्ञान खात्यातर्फे राज्यातील एकूण 44 पोलीस स्थानकावरील कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

44 पोलीस स्थानकात एकूण 524 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने हा पुढाकार घेतला. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान खात्याने 44 पोलीस स्थानकात एकूण 524 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. त्यानुसार आता वरील घटनांना आळा बसेल व पोलिसांच्या कार्यातही बदल पडणार आहे. रोजच्या सर्व घडामोडीवर रेकॉर्डिंग होणार आहे.

वास्को पोलीस स्थानक तिसर्‍या डोळ्याच्या नजरेत बंदिस्त

दरम्यान वास्को पोलीस स्थानकातही सर्व कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. आता वास्को पोलीस स्थानकातही तिसर्‍या डोळ्याच्या नजरेत बंदिस्त असणार आहे. दरम्यान याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नीज गोंयकाराचे प्रवक्ता चंद्रशेखर वस्त यांनी राज्यातील सर्व पोलीस स्टेशनवर विनंतीला मान देऊन सीसीटीव्ही बसवण्यात आल्याने समाधान व्यक्त केले. तसेच राज्य सरकारचे सचिव माहिती तंत्रज्ञान खात्याचे त्यांनी आभार व्यक्त केले.

पोलिस निरीक्षक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शह देत असल्याच्या तक्रारी

सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने आता प्रत्येक पोलिस स्थानकावर खास करून पोलिस निरीक्षकावर करडी नजर असेल, कारण लोकांकडून पोलीस निरीक्षक राज्यातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शह देत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावर आळा बसणे अत्यंत गरजेचे होते. याव्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरा बसवले म्हणजे काम झाले नसून त्या कॅमेराची देखबाल होणे तेवढेच गरजेचे आहे. तसा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशी विनंती वस्त यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT