Police seized liquor  Dainik Gomantak
गोवा

गोवा पोलिस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; निवडणूक काळात 'इतक्या' कोटींचा मुद्देमाल जप्त

मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली.

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस 'अ‍ॅक्शन मोड' मध्ये आले आहे. गोवा पोलिसांचे विविध ठिकाणी छापे मारण्याचे सत्र सुरू आहे. मागील काही दिवसात पोलिसांनी ठीक ठिकाणाहून बेकायदेशीर मद्य, रोख रक्कम, ड्रग्स अशा अनेक बेकायदा वस्तू जप्त केल्या आहेत. यावर शुक्रवारी बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले, गोवा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात आतापर्यंत बेकायदेशीर मद्य, रोख रक्कम, ड्रग्स आणि इतर बेकायदा वस्तू असा एकूण 2.44 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Election Officer

गोवा (Goa) राज्यातील विविध ठिकाणी पोलिस (Police) छापे मारून बेकायदेशीर वस्तु जप्त करत आहेत. शुक्रवारी कोलवाळ पोलिसांनी वयलोवाडो-कोलवाळ येथे साठवून ठेवलेली 69 हजारांची दारू जप्त केली. तसेच पेढणे पोलिसांनी देखील 171 लिटर मद्य जप्त केले. हा मद्यसाठा एमएच 07 एजे 1272 या वाहनात लपवण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मागील काही दिवसात मुरगाव तालुक्यातील वेर्णा आणि वास्को (Vasco) पोलिसांनी धडक कारवाई करत एका रेस्टॉरंट मधून तसेच एका बारमधून एकूण 93 हजार 429 रुपयांची बेहिशोबी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. बेहिशोबी मद्याच्या बाटल्या वास्कोच्या अबकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

दरम्यान, दुसऱ्या एका छाप्यात वास्को पोलिसांनी केलेल्या कारवाईत वास्को पोलीस निरीक्षक नितीन हळणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका बारमधून 40 हजार रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला. हा मद्य साठा बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आला होता. यात छाप्यात किंग फिशर स्ट्रॉंग 36 बाटल्या, किंगफिशर प्रिमियम 48 बाटल्या, रॉयल चॅलेंज 7 बाटल्या, बडवायजर मोठ्या 60 बाटल्या, पाईंट 211 बाटल्या, ब्रीझर 24 बाटल्या, कोरोना 24 बाटल्या, मॅकडोवेल 26 बाटल्या, कार्लस बग 24 बाटल्या, ओल्ड मोंक 6 लहान व 8 मोठ्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याची किंमत 40 हजार रुपये एवढी होती. हे दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 93 हजार 429 रुपयांची बेहिशोबी मद्याच्या बाटल्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT