Goa Police search operation for fugitive accused posing as an ED officer Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: फरार बलरामच्या शोधासाठी विमानतळांवर 'अलर्ट'; ED अधिकाऱ्याचे सोंग घेऊन लूट, 'इंटर ऑपरेबल सिस्टिम'द्वारे शोध सुरू

Fake ED Kidnapping Case Goa: गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा बलराम दुबईला पळून गेल्याचा संशय असून, त्याचे छायाचित्र आणि गुन्ह्याची माहिती विमानतळांवर पाठविण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: ईडी अधिकारी असल्याचे भासवून बड्डे येथील व्यापारी अशोककुमार यांचे अपहरण करून त्यांच्याकडून तीन लाख रुपये लुटल्याप्रकरणी मुख्य संशयित बलराम करीशेट्टी याचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांनी आता ‘इंटर ऑपरेबल सिस्टिम’ पोर्टलचा आधार घेतला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा बलराम दुबईला पळून गेल्याचा संशय असून, त्याचे छायाचित्र आणि गुन्ह्याची माहिती विमानतळांवर पाठविण्यात आली आहे. २४ मार्च रोजी माकाझन येथील कॅनरा बँकेसमोरून अशोककुमार यांचे अपहरण करण्यात आले होते.

संशयितांनी त्यांना त्यांच्या ह्युंदाई व्हेन्यू कारमध्ये जबरदस्ती बसवून कारवारजवळील निर्जनस्थळी नेले आणि तीन लाख रुपये हिसकावून फरार झाले. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अटक टाळण्यासाठी बलरामने प्रथम दक्षिण गोवा सत्र न्यायालयात, त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र, दोन्ही ठिकाणी त्याला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर तो परागंदा झाला. पोलिसांनी गोवा, कारवार, हुबळी तसेच महाराष्ट्रातील दोडामार्ग परिसरात शोधमोहीम राबविली. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

बलरामचे वडीलच मुख्य सूत्रधार!

या प्रकरणात अकोला येथील नीलेश जाधव आणि माकाझन येथील कॅनरा बँकेचे व्यवस्थापक अजितकुमार कट्टीमणी यांना अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही जामिनावर आहेत. तपासात बलरामचे वडील बाबू शेट्टी हे या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले असून, ते दोडामार्ग येथून हे जाळे चालवत असल्याचा संशय आहे. बलराम अटकेत आल्यानंतर या अपहरण आणि लूट प्रकरणातील आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT