Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Goa Police: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे.

Manish Jadhav

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. सुभाष प्रधान असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा ओडिशातील असून कांदोळी येथे राहत होता.

वेश्याव्यवसायात सहभागी असल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुभाषला अटक केली. हॉटेलमध्ये काम करत असताना सुभाष वेश्या रॅकेटचा भाग बनला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आयटी कायद्याच्या कलमांखाली सुभाषविरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

याआधी उत्तरप्रदेशातील गाझीयाबादमधून तिसरा आरोपी योगेश कुमारला अटक केली. योगेशच्या शोधात गोवा पोलिसांच्या (Goa Police) टीमने गाझियाबादला पोहोचली होती. योगेशच्या अटकेआगोदर या प्रकरणात सय्यद उस्मान (54, आंध्रप्रदेश) आणि महम्मद महबुल्ला (30, हरियाणा) या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

योगेश मास्टरमांइड

मिळालेल्या माहितीनुसार, योगेशच या रॅकेटचा मास्टरमांइड होता. त्यानेच deepikaverma.com नावाची वेबसाईट बनवली होती. घटनास्थळावरुन पोलिसांनी योगेशकडील सीपीयू जप्त केला. तसेच, आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये पोलिसांनी योगेशविरोधात गुन्ह्याची नोंद केली.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सुमारे 78 अश्‍लिल एस्कॉर्ट सर्व्हिस संकेतस्थळे ब्लॉक करण्यात आल्याची माहिती यापूर्वी क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली होती. हे संशयित एस्कॉर्ट सर्व्हिस संकेतस्थळावर महिलांची अश्‍लिल छायाचित्रे प्रसिद्ध करुन गोव्यात एस्कॉर्ट सेवेची माहिती देत असत.

दलालांशी संपर्क

ग्राहकांनी केलेल्या मागणीनुसार हे संशयित दलालाशी संपर्क साधत असे. त्यानंतर रोख किंवा गुगल पे किंवा पेटीएम मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पैशांचा व्यवहार होत होता. त्यातून या संशयितांना कमिशनचा मोबदला मिळत असे. हे संशयित बंगळुरू, चेन्नई व भारतातील (India) इतर मोठ्या शहरांमध्ये एस्कॉर्ट सेवांसाठी समान संकेतस्थळे चालवत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Konkani Language Debate: मराठी आणि कोंकणीच्या संघर्षातून भाजपचा राजकीय उदय

PM Kisan Scheme Update: 'पीएम किसान योजना' बंद होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केला पुढील पाच वर्षांचा रोडमॅप

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

SCROLL FOR NEXT