Goa Police Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Police Fraud: गोवा पोलिस खात्यात 17.30 लाखांची अफरातफर; महिला पोलिस कॉन्स्टेबल निलंबित

Goa Police: महिला पोलिस कॉन्स्टेबलने जमा करण्याची रक्कम आर्धीच जमा केल्याने गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.

Pramod Yadav

डिचोली: वाहतूक चलनाची अफरातफर केल्याप्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल पूजा गावस हिला निलंबित करण्यात आले आहे. १७.३० लाख रुपयांचा हा गैरव्यवहार असल्याचे उघडकीस आले आहे. डिचोली पोलिस स्थानकात हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, डिचोली परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना चलनाद्वारे दंड ठोठावला. दंडातून गोळा झालेली रक्कम वाहतूक मुख्यालयात जमा होते.

यानंतर संबधित पोलिस स्थानकात तैनात असलेल्या कॉन्स्टेबलकडे सुपूर्द केली जाते. दरम्यान, यानंतर ही रक्कम बँकेत जमा केली जाते पण, पूजा गावस या कॉन्स्टेबलने मिळालेल्या रक्कमेतील अर्धीच रक्कम बँकेत जमी केल्याचे आढळून आले आहे.

डिचोली वाहतूक खात्याने जारी केलेले चलन आणि जमा झालेली रक्कम यात तफावत आढळून आली. त्यानंतर आर्थिक अफरातफर झाल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत कॉन्स्टेबल पूजा गावसने गुन्हा मान्य केला असून, सर्व रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, दोषी आढळलेल्या कॉन्स्टेबल पूजा गावसला निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT