पणजी येथील आझाद मैदानाबाहेर महात्मा गांधी मार्गावर ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घोषणा दिल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी (Police) ३०० अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देणे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे आणि मतदारयादीच्या सखोल पुनर्निरीक्षणातील त्रुटींवर लक्ष वेधणे, या उद्देशाने गोव्यातील कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांनी ‘हिंदुत्व मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्याचा आरोप आहे. या घोषणांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी केली होती. दरम्यान, आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती; मात्र पोलिसांनी ती नाकारली होती. पणजीचे पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १९६ आणि २९९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सीजेपीने समाजमाध्यमांवरून स्पष्टीकरण जारी केले होते. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणाऱ्या किंवा कोणाचाही अनादर करणाऱ्या वक्तव्यांचे, घोषणांचे अथवा कृत्यांचे आम्ही समर्थन करत नसल्याचे त्यात म्हटले आहे. देशातील सर्व धर्म, जाती आणि समुदायांचा पक्ष मनापासून आदर करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.