Gauri Achari Murder Case | Gaurav Bidre Case Dainik Gomantak
गोवा

Gauri Achari Case : गौरी आचारी हत्येप्रकरणी 303 पानी आरोपपत्र दाखल

गौरी आचारीच्या खून प्रकरणी गौरव बिद्रे याच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात खुनाच्या आरोपाखाली आरोपपत्र सादर केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Gauri Achari Case : गौरी आचारी हत्या प्रकरणी गौरव बिद्रे याच्या विरुद्ध पोलिसांनी न्यायालयात खुनाच्या आरोपाखाली आरोपपत्र सादर केले आहे. 303 पानी आरोपपत्रात एकूण 49 साक्षीदार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.

गेल्या जून महिन्यात गोव्याला हादरून सोडलेल्या खांडोळा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका गौरी आचारी हिच्या खूनप्रकरणाचे तपासकाम पूर्ण झाले आहे. फॉरेन्सिक अहवालामुळे आरोपपत्र दाखल करण्याचं कार रखडलं होतं. आता अहवाल हाती मिळाल्यावर संशयित गौरव ब्रिदे याच्याविरुद्ध खुनाच्या तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. संशयित सध्या कोलवाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

गौरी या तरुणीचा गळा आवळून तिचा खून केलेल्या संशयित गौरव ब्रिदे याने कदंब पठारावरील झाडीत तिचा मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणाचा तपास जुने गोवेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी करताना संशयिताला 24 तासाच्या आत अटक केली. त्यानेही खुनाची कबुली दिली. त्यामुळे तपासकामातील साक्षीदार तसेच गौरी व गौरव यांच्यात घटनेच्या शेवटच्या क्षणी मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची तसेच व्हॉटसअप मेसेजिस माहितीसाठी ते फॉरेन्सिक लेबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. घटनेपूर्वी त्याला गौरी हिच्यासोबत जुने गोवे येथील प्राईमरोजवळील इमारतीजवळ पाहिलेल्या काही साक्षीदारांच्या साक्षी पोलिसांनी नोंदवल्या आहेत.

गौरी हिच्या पालकांच्याही जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. तिने संशयितांसोबतची मैत्री नाकारल्याने त्याने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने पोलिस कोठडीतील जबानीत खुनाची कबुली दिली आहे.

बिद्रे याला कोलवाळ कारागृहात ठेवण्यात आले आहे. गौरी हिच्या खुनानंतर त्याला पश्‍चाताप झाल्याचा किंवा त्याच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. नेहमीप्रमाणे तो कारागृहात इतर कैद्यांबरोबर मिसळून असतो. खुनाच्या घटनेनंतर त्याला कोठडीत कोणीही भेटण्यास आले नसल्याची माहिती कारागृहातील एका कर्मचाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT